Tag Archive: India


पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक निर्णय आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक गोंधळातून थोडक्यात बचावले, असं मला अमेरिकेत आल्यापासून वाटत होतं. पण एक दिवस माझ्यावरही कॅशलेस-कार्डलेस होण्याची वेळ ओढवली.

बोस्टनहून मी एकटीच न्यूयॉर्कसाठी निघाले, पण माझं क्रेडिट कार्ड बसस्टॉपवरच्या दुकानातच राहिलं. बस अर्ध्या रस्त्यात असताना मला कार्ड हरवल्याचं लक्षात आलं, ते ब्लॉक करून पुढचे सोपस्कार तर झाले. पण आता न्यूयॉर्कमध्ये पोहोचल्यावर काय करायचं असा मोठा प्रश्न उभा राहिला.

अमेरिकेतली कार्ड सिस्टिम थोडी वेगळी आहे, इथं कॅशपेक्षा कार्डमध्ये जास्त व्यवहार होतात. जास्त कॅश जवळ बाळगणंही धोक्याचं. त्यामुळं छोट्याशा गोष्टीसाठीही कार्ड स्वाईप करावं लागतं कधीकधी. एटीएममधून पैसे काढणं तुलनेनं महाग पडतं. त्यात माझं आणि प्लास्टिक मनीचं फारसं पटत नाही. स्वतःचाच रागही आला. तुलाच अॅडव्हेंचर हवं होतं ना, आता हे सावर, असं स्वतःला बजावलं.

जवळ दोन वेळच्या खाण्याइतकेच डॉलर्स शिल्लक राहिले होते आणि त्यात मी न्यूयॉर्कला उतरले. पण काही मित्र धावून आले. शॉन टंडननं कॅश हातावर ठेवली, आणि नोटांची किंमत काय असते, ते एका क्षणात उमगलं. मनात विचार आला, पैसा महत्त्वाचा आहेच, पण त्याहीपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची आहेत. खरं तर शॉनची आणि माझी ती पहिलीच भेट होती. शॉन न्यूयॉर्कमधला वार्ताहर आहे आणि माझ्या एका मित्राचा मित्र. पण एका फोनकॉलवर लगेच धावून आला.

शॉन आणि त्याची पत्नी मारिया गोनुलू या दोघांनी मग मला डिनरसाठी येण्याचा आग्रह केला. काही पत्रकार एकत्र जमले आणि पुढचे काही तास गप्पांचा फडही रंगला. विषय अर्थातच ट्रम्प आणि मोदी.

नरेंद्र मोदी या नावाविषयी अमेरिकन नागरिकांच्या मनात एक कुतूहल दिसून येतं. त्यांचा नोटा अचानक रद्द करण्याचा निर्णय अनेकांना रुचलेला नाही.

modi-hillary-trump-580x336

दुसरीकडे ट्रम्प आपले राष्ट्राध्यक्ष होणार, पुढची किमान चार सत्तेच्या सिंहासनावर बसणार, ही गोष्ट पचवणं अनेकांना कठीण जातंय. पत्रकारांनाही अमेरिका कसा काय असा निर्णय घेऊ शकते, हा प्रश्न पडला आहे. ट्रम्पना मोठा पाठिंबा मिळेल याची खात्री अनेकांना होती. पण त्यांची निवड होईल असं वाटत नव्हतं.

गेल्या दीड वर्षापासून हिलरी क्लिंटन यांच्याविषयी वार्तांकन करणाऱ्या इव्हाननं क्लिंटन यांची प्रचार मोहिम जवळून पाहिली आहे. विजयाच्या एवढ्या जवळ जाऊन मग थेट पराभव, ही गोष्ट क्लिंटन समर्थकांना पटत नाहीये.

क्लिंटन यांनी इतर काही छोट्या राज्यांचा दौरा केला असता, आपल्यावरच्या आरोपांची थेट आणि सर्वसामान्य लोकांना पटतील अशी उत्तरं दिली असती तर चित्र वेगळं असतं. दुसरीकडे ट्रम्प आपल्या लोकांना आवडेल अशी आक्रमक भाषा बोलत होते.

इव्हान आता काही दिवस ट्रम्प टॉवरमधून रिपोर्टिंग करणार होता. डोनाल्ड ट्रम्प याच इमारतीत राहतात, आणि त्यांना भेटण्यासाठी आजकाल बरेच लोक ये-जा करत असतात. ट्रम्पनी कुणाची भेट घेतली, कुणाची कुठल्या पदावर नियुक्ती होणार याविषयी न्यूयॉर्कमध्ये चर्चांना उधाण आलंय. आणि सामान्य न्यूयॉर्कवासियांना या चर्चेचा त्रासही होतोय.

आमच्या गप्पांदरम्यान मारियानं एक वेगळा मुद्दा मांडला. आर्थिक मंदीमुळं गेल्या 9-10 वर्षांत अनेक अमेरिकन नागरिकांना नोकरी, घर गमवावं लागलंय. अशा परिस्थितीत लोक कुठलाही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळं लोकांना थेट दोषच देता येणार नाही. ओबामांनी म्हटल्यानुसार लोकांना बदल हवा होता, पण नेमका कोणता बदल, हेच लक्षात आलेलं नाही. डेमोक्रॅटिक पक्षाच्या समर्थकांनीच नाही, तर जगभरातल्या विचारी लोकांना हे समजून घ्यावं लागेल.

unnamed-580x395

इकॉनॉमी रन्स द वर्ल्ड – अर्थव्यवस्थेवरच जग चालतं. पण ट्रम्प यांच्याकडे अर्थव्यवस्थेसाठी कुठलीच ठोस विकासयोजना दिसत नाही. अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज19 ट्रिलियन डॉलर्सच्या पलिकडे गेलं आहे. दर सेकंदाला वाढणारा कर्जाचा आकडा नियंत्रणाखाली आणण्याचं आव्हान ट्रम्पना पेलावं लागणार आहे. नाहीतर दुसरं आर्थिक संकट उभं राहण्याची भीती शॉननं व्यक्त केली.

न्यूयॉर्क म्हणजे जगातल्या आर्थिक उलाढालींचं सर्वात महत्त्वाचं केंद्र. वॉल स्ट्रीट असो वा गजबजलेला टाईम्स स्क्वेअर. ट्रम्प यांच्या निवडीनंतर या दोन्ही ठिकाणी चिंतेचं वातावरण आहे.

मारिया मूळची ग्रीसची आहे तर इव्हान फ्रान्सचा. त्यामुळं साहजिकच आमच्या गप्पांचा ओघ युरोपियन राजकारणाकडेही वळला. ब्रेक्झिट आणि अमेरिकन निवडणुकीनंतर आता फ्रान्समध्ये काय होणार अशी चिंता इव्हाननं व्यक्त केली.

गप्पांच्या ओघात आणखी एक मुद्दा समोर आला. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी आवश्यक २७० इलेक्टोरल मतं जमा केली. पण थेट लोकांनी केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत (पॉप्युलर व्होट्स) ते बरेच मागे पडले आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत यंदा 13,24,39,666 लोकांनी मतदान केलं. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ३२ कोटी आहे. त्यातले २५ कोटी ११ लाख लोक मतदानायोग्य वयाचे आहेत. म्हणजे एकूण लोकसंकोख्येच्या जवळपास 50 टक्के आणि मतदानायोग्य लोकसंख्येच्या 52 टक्के लोकांनीच मतदान केलं.या 13 कोटी 24 लाख मतदारांपैकी डोनाल्ड ट्रम्प यांना 6,18,64,015 मतं मिळाली. तर 6,35,41,056 मतदारांनी हिलरी क्लिंटन यांच्या बाजूनं कौल दिला. म्हणजे क्लिंटन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा जवळपास 14 लाख मतं जास्त मिळाली.

अमेरिकेच्या संविधानानुसार लोकांच्या मतापेक्षा राज्यांचं मत जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं पॉप्युलर व्होट्समधला विजय निरर्थक आहे, पण पॉप्युलर व्होट्सची आकडेवारी समोर आल्यानं लोकांमधली, विशेषतः तरुणांमधली नाराजी वाढते आहे. अमेरिकन समाज दुभंगला आहे, आणि ही दरी इथं अधूनमधून जाणवत राहते.

त्या रात्री उशीरा डिनरनंतर मी, इव्हान, शॉन आणि मारिया मॅनहॅटनच्या रस्त्यांवरून फिरायला निघालो. चार वेगवेगळ्या देशांतले आम्ही चौघंजण, पण चौघांच्या मनातले प्रश्न एकमेकांशी मिळतेजुळते आहेत. ते मिटणार की नाहीत, हे काळच ठरवेल.

एक मात्र खरं, अमेरिका आजवर अनेकांना सुरक्षित देश – सेफ हेवन – वाटत होता, पण तिथेही लोकांच्या मनातली असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे. कुणी तर देश सोडून जाण्याची भाषा करू लागलं आहे. अमेरिकेतला वर्णद्वेष कमी झाला असला तरी संपलेला नाही, हेही वास्तव आहे.

– जान्हवी मुळे

 

Advertisements

What Kiran Rao said, came from a mother’s heart. A mother whose kid’s father belongs to other religion. and being a celebrity kid doesn’t mean you won’t be bullied. Kiran might be wrong, she might be worrying too much or thinking too much, but it’s cruel to judge what a mother feels.

But let’s face it. We Are Not The Safest Place for Children.

Our cities are overcrowded and polluted. Our villages lack infrastructure, some are ruined because of drought.

We talk of harmony but are ready to take on each other any instance. We are losing acceptance and difference of opinions and there is polarization in the society about anything and everything.

We see a rise in crimes against women and children and elderly. People are still being persecuted on basis of caste. Women are still disallowed from entering temples for being women. Communities force their eating habits on society. Writers and thinkers are killed for speaking out. And the “I don’t care” attitude still persists.

Youth is getting addicted to technology and losing touch with reality. Drinks, drugs and tobacco poses a threat. Traffic rules are broken every second and road-rage is becoming common. People still die of Dengue, Malaria, TB, Diarrhoea, hunger and cold.

Inflation is flattening the middle class. Rich and intellectuals have no time for poor and persecuted. Poor are barely surviving and slowly losing it.

Trees are cut down without a second thought, miners are destroying jungles, rivers are shrinking, seas are rising, sudden flash-floods are displacing thousands every year.

You will say this is happening all over the World. But should we not focus on the fact- this is happening in India of 21st century? Sure we have a great past, and strive for a glorious future, but we shall not forget the present that counts most.

Let’s face it. IT IS ALL HAPPENING. It has been happening not just for past few months, but for over a decade and half. What we see today is a result of what we all have been doing (or not doing) for years.

We are certainly not the safest and best place in the world. Perhaps we are on the brink. But as Jeff Daniels character in “The Newsroom”, Will McAvoy says in his oration about America, “we can be the best country in the world”

We still have people who care about what is happening around. We still have youngsters ready to die on the border, we still have women defying all odds. We still have people raising their voices against injustice. We still have HOPE.

And as long as hope is there, we can fight all insecurities. Doesn’t matter who is our leader. What matters is who we are and what we want to be.

If your brother is afraid of something should you mock him all the time? Or should you stand by his side, make him trust yourself and destroy his insecurities? Decide. Decide what is more Indian. To rage and destroy or to love and heal? to fire in defence or to kill for supremacy?

Let’s decide. Let’s make India a much better place than what it is- a Great country. A place where every mother would want her children to be.

  • Janhavee Moole, ABP Majha/ABP News.


पाकिस्तानी राष्ट्रध्यक्ष आसिफ अली झरदारींचा भारत दौरा म्हणजे एक खाजगी दौरा होता. पण तरिही वाट वाकडी करून झरदारी दिल्लीला गेले आणि त्यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

खरंतर दोन राष्ट्रनेत्यांमधली खाजगी भेटही राजकीय महत्त्वाची असते. तरिही झरदारी आणि मनमोहन भेटीदरम्यान अपेक्षेप्रमाणेच कोणतीही मोठी घोषणा झाली नाही. मात्र पाकिस्तानसाठी आणि स्वतः झरदारींसाठी ही भेट महत्त्वाची मानली जातेय.

आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान एकाकी

एकीकडे ‘ब्रिक्स’ (BRICS) म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या पाच राष्ट्रांच्या बैठकीनं भारत,  रशिया आणि चीन यांच्यातलं नातं घट्ट झालंय. तर दुसरीकडे चीननं शिन झियांग प्रांतातल्या दहशतवादाचे धागेदोरे पाकिस्तानात असल्याचे संकेत दिलेत. त्यामुळं पाकिस्तानच्या चीनबरोबरच्या संबंधांमध्येही तेढ निर्माण होतेय.

त्यातच मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हफीज सईदसह अनेक दहशतवाद्यांना अभय दिल्यानं पाकिस्ताननं अमेरिकेचीही नाराजी ओढवून घेतलीय. काही दिवसांपूर्वी श्रीलंकन सरकारवर तिथल्या तमिळ नागरिकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संयुक्त राष्ट्रांत ठराव मांडण्यात आला, त्यावेळीही पाकिस्ताननं श्रीलंकन सरकारची बाजू घेतली होती. हे पाऊल अमेरिकेच्या विरोधात जाणारं. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातली दरी आणखी रुंदावतेय.

त्याशिवाय नुकतंच सेऊलमध्ये झालेल्या अणू परिषदेत पाकिस्तानच्या धोरणांवर टीका झाली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकिस्तान आणखीनच एकाकी पडलंय.

भारताबरोबर व्यापारी संबंध

जवळचे नातेवाईक दूर होतात, तेव्हा शेजाऱ्यांना तरी सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न माणूस करतो, पाकिस्तानचंही सध्या तसंच चाललंय. जगभर विरोध वाढणं पाकिस्तानला परवडणारं नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाचं मन वळवण्यासाठी पाकिस्तानला भारताशी संबंध सुधारणं गरजेचं आहे. म्हणूनच तर पाकिस्ताननं भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा, म्हणजेच व्यापारासाठी पहिली पसंती दिलीय.

पाकिस्तान आणि अमेरिकेत निवडणुका

पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात निवडणुका होणार आहेत. त्यासाठीच झरदारी आणि पंतप्रधान गिलानींच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीला आपण देशाची प्रतिमा सुधारत असल्याचं चित्र दाखवायचंय. तर अमेरिकेतही यंदा होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक संबंधांमध्ये सुधारण ही बराक ओबामांसाठी जमेची बाजू ठरू शकते. म्हणूनच अमेरिकेनंही झरदारींच्या भारत-भेटीचं स्वागत केलं.

झरदारींचं असुरक्षित भवितव्य

आसिफ अली झरदारी सध्या पाकिस्तानचे राष्ट्रपती असले, तरी त्यांच्या पदावर आणि भवितव्यावर टांगती तलवार कायम आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप वारंवार होत आहेत. अशा परिस्थितीत झरदारींना पाकिस्तानातील जनतेचा विश्वास जिंकायचाय. भारताकडून काही पदरात पडलं तर, आपलं काम सोपं होईल अशी झरदारींना आशा असावी.

बिलावलचा प्रसार

झरदारी-मनमोहन भेटीइतकीच यावेळी चर्चा झाली ती बिलावल भुट्टो-झरदारी आणि राहुल गांधी या पुढच्या पिढीच्या नेत्यांची भेटीची.

अवघ्या २३ वर्षांच्या बिलावलनं पाकिस्तान पिपल्स पार्टीचा चेअरमन म्हणून अजूनतरी आपली वेगळी छाप पाडलेली नाही. मात्र तरिही भविष्यातला पाकिस्तानचा नेता म्हणून बिलावलला प्रोजेक्ट केलं जातं आणि भारताच्या भविष्यातल्या नेत्याला भेटणं बिलावलसाठी तरी नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

– जान्हवी मुळे, स्टार माझा

http://starmajha.newsbullet.in/india/34-more/14970-2012-04-08-15-30-40

भारताचा नेमबाज रोंजन सोढीनं रचलाय इतिहास. रोंजननं सलग दुसऱ्या वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये डबल ट्रॅपचं सुवर्णपदक जिंकलंय. यूएईमध्ये झालेल्या स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये रोंजननं एकूण १८७ गुणांची कमाई केली. चीनच्या हु बिनयुआनसह रोंजनची बरोबरी झाली. मग टायब्रेकरमध्ये रोंजननं २-१ अशी बाजी मारली आणि सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदकाची कमाई केली. रोंजननं गेल्या वर्षी टर्कीमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर त्यानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये २ रौप्य आणि एशियन गेम्समध्ये एक सुवर्णपदक जिंकलं. रोंजन सध्या शॉटगन डबल ट्रॅपच्या जागतिक क्रमवारीतही अव्वल स्थानावर आहे.

Somebody asked why all news channels are giving this much of attention to 9/11 anniversary? Well, here is my answer…

Everyone is talking about it because 9/11 changed d whole world, not justAmerica.

It gave birth to new Indo-US relations.

It’s because of these attacks, US started 2 wars and cost of those war affected whole world economy. E.g. Oil was around $28 per barrel then and it’s over $ 100 now. Wars played a big role in shooting up the inflation. Also, because of the changed global scenario,China rose to power.

Another impact is that Europe and Americabecame more sensitive towards issues of terrorism.

There was a need for removing prejudices against Islam and Arabs. UN paid attention to development in Arab countries. The 2002 UN report on
human rights in Arab world is a catalyst in the thought process that eventually turned into Arab Spring..

Also, b4 9/11, major terror attacks on Indiawas 1993 blasts. All big ones came after that. Because, a massive number of people turned radical.
As Michael Jordan had said, we were all innocent before that day. It’s not the same now.. Don’t take the attacks as a one off incidence. Understand it’s historical important in international relations.

पॅरीसचं रोलँ गॅरो स्टेडियम सज्ज झालंय वर्षातल्या दुसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी.. फ्रेन्च ओपन २०११ला रविवारपासून सुरू होतेय. क्ले कोर्ट वरच्या या टेनिस स्पर्धेचं यंदाचं एकशेदहावं वर्षय.

राफेल नदाल, नोवाक ज्योकोविच की रॉजर फेडरर.. यंदाच्या फ्रेन्च ओपनमध्ये रंगणार आहे अशी तिरंगी लढाई…

यंदा अपेक्षेप्रमाणेच पुरूष एकेरीत गतवेळाचा विजेता नदालला अव्वल मानांकन मिळालंय. पण  ५ वेळचा चॅम्पियन नदालपेक्षाही यंदा सर्वांच्या नजरा असणार आहेत दुसऱ्या मानांकित नोवाक ज्योकोविचवर.

सर्बियाच्या या सुपरस्टारनं यंदाच्या मोसमात एकही सामना गमावला नाहीए. ज्योकोविचनं यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसह ७ जेतेपदं खिशात टाकलीयत आणि सलग चार वेळा राफेल नदालवर मात केलीय. सुपर सर्ब नोवाक आता पॅरिसच्या लाल मातीत नदाल आणि फेडररचं राज्य मोडून काढण्यासाठी उत्सुक आहे.

जेतेपदाच्या शर्यतीत नदाल आणि ज्योकोविचप्रमाणेच रॉजर फेडररलाही विसरून चालणार नाही. २००९चा विजेता फेडरर यंदा तिसऱ्या स्थानावर घसरला असला तरी क्ले कोर्टवर त्यानं यंदा चांगला खेळ केलाय.

महिला एकेरीत अव्वल मानांकित कॅरोलिन वोझ्नियाकी आणि दुसरी मानांकित किम क्लायस्टर्स जेतेपदाच्या सर्वात प्रबळ दावेदार आहेत. डेन्मार्कच्या वोझ्नियाकीला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठूनही आतापर्यंत एकही ग्रँड स्लॅम जिंकता आलेलं नाही. तर सुपर मॉम किम ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यावर दुखापतीमुळं काही दिवस टेनिसपासून दूर राहिली होती.

रशियन ब्युटी मारिया शारापोव्हालाही स्पर्धेआधीच सूर गवसलाय. शारापोव्हानं आपल्या कारकीर्दीत ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. करियर स्लॅम पूर्ण करण्यासाठी शारापोव्हाला फ्रेन्च ओपनच्या जेतेपदाची आवश्यकताय. दरम्यान सेरेना आणि व्हीनस या विल्यम्स सिस्टर्सनीही स्पर्धेतून माघार घेतल्यानं महिला गटातली चुरस आणखी वाढलीय. त्यामुळं यंदाही पॅरिसमध्ये एखादा सरप्राईज रिझल्ट पहायला मिळू शकतो. गेल्या वर्षीही सगळे अंदाज चुकवत फ्रान्सेस्का स्कियावोननं जेतेपद मिळवलं होतं.

भारतीयांपुढे मोठं आव्हान

फ्रेन्च ओपनच्या पुरूष एकेरीत सोमदेव देववर्मन आणि महिला एकेरीत सानिया मिर्झाच्या कामगिरीवर भारतीयांची नजर असेल. मात्र दोघांचाही मार्ग अजिबात सोपा नाहीये. जागितिक क्रमवारीत सहासष्टाव्या स्थानावर असेलल्या सोमदेवला पहिल्याच फेरीत क्रोएशियाच्या वर्ल्ड नंबर वन इवान ल्य़ुबिसिचचा सामना करायचाय. तर सानिया मिर्झासमोर आव्हान असणारेय जर्मनीच्या क्रिस्टिना बरवाहचं.

तर लिअँडर पेस आणि महेश भूपती ही भारतीय जोडी एका दशकानंतर पुन्हा एकदा पॅरीसमध्ये खेळायला उतरणार आहे. 1999 आणि २००१ मध्ये या जोडीनं फ्रेन्च  ओपनचं जेतेपद मिळवलं होतं. पेस-भूपतीबरोबरच भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी या जोडीवरही सर्वांच लक्ष राहील.

केविन ओब्रायनच्या शतकानं फक्त त्याच्या टीमलाच नाही, तर अख्ख्या आयर्लंडला दिलाय एक नवा आत्मविश्वास.

एरवी आयर्लंडमध्ये तिथल्या राजकीय घडामोडी आणि ढासळती अर्थव्यवस्था यांचीच चर्चा सुरू असायची. पण २ मार्चनंतर हे चित्र बदललं. आयर्लंडमध्ये आता उत्साहाचं वातावरण पसरलंय. आणि ही किमया साधलीय आयरिश क्रिकेट टीमनं. सलग दुसऱ्या विश्वचषकात आयर्लंडनं धक्कादायक विजयांची नोंद केलीय.

 

२००७ मध्ये विश्वचषकात पहिल्यांदाच खेळताना झिम्बाब्वेशी बरोबरी, पाकिस्तान आणि बांगलादेशवर विजय, आणि यंदा चक्क इंग्लंडवर मात… ही आहे आयर्लंडची कामगिरी.

 

परीकथांचा, रहस्यांचा गूढ देश म्हणून आयर्लंड प्रसिद्धय. आणि याच आयर्लंडनं लिहिली आहे क्रिकेटमधली आणखी एक सुंदर परीकथा. आयरिश क्रिकेट आता एकदम प्रकाशझोतात आलंय. पण एरवी इंग्लंडच्या अगदी जवळ असूनही क्रिकेटविश्वात पाय रोवण्यासाठी आयर्लंडला उशीरच झाला. कारण ठरली तिथली राजकीय परिस्थिती.

 

इंग्लंडच्या शेजारी असलेल्या ह्या बेटावर एकेकाळी इंग्लंडनं राज्य केलं होतं. पण कडवा संघर्ष आणि गृहयुद्धानंतर 1921 मध्ये आयर्लंडला स्वातंत्र्य मिळालं.. नॉर्दन आयर्लंड आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंड अशा दोन देशांत आयर्लंडची फाळणी झाली. नॉर्दन आयर्लंडनं ब्रिटिश अधिपत्याखाली युनायटेड किंग्डममध्ये प्रवेश केला. पण इंग्लंड आणि आयर्लंडमधली तेढ अर्थातच टिकून राहिली.

 

रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये फॉरिन गेम्सवर, खास करून इंग्लिश खेळांवर बंदी घालण्यात. आयरिश क्रिकेटला त्याचा फटका बसला.

 

पण १९९०च्या दशकात जागतिकीकरणानंतर चित्र पालटलं. १९९३ मध्ये आयर्लंडला आयसीसीत स्थान मिळालं. रिपब्लिक ऑफ आयर्लंड आणि नॉर्दन आयर्लंडची मिळून एकच क्रिकेट टीम तयार करण्यात आली आणि चौदा वर्षांतच म्हणजे २००७ साली त्यांचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरला. इतकंच नाही तर त्यांनी विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

 

ते यश तात्पुरतं नव्हतं हे आयर्लंडनं यंदा पुन्हा सिद्ध केलंय.

 

तसं पहायला गेलं आयर्लंड आणि भारतामध्येही जिव्हाळ्याचं नातंय. दोन्ही देशांच्या इतिहासाची काही पानं एकत्र लिहिली गेली आहेत. आयर्लंडच्या स्वातंत्र्यलढ्याला लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक भारतीय नेत्यांचा पाठिंबा होता. सुभाषचंद्र बोसही आयरिश नेत्यांच्या संपर्कात होते. तर अनेक आयरिश विचारवंतांनी आणि नेत्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. मूळच्या आयरिश असलेल्या अॅनी बेझंट यांनी तर होमरूल लीगची स्थापना करून भारताच्या स्वातंत्रलढ्यात सक्रीय सहभागही घेतला होता.

 

ही देवाणघेवाण फक्त राजकीय पातळीवरच नव्हती. दोन देशांमध्ये त्या काळात सांस्कृतिक नातंही जोडलं गेलं होतं. भारताचे पहिले नोबेलविजेते रविन्द्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’ची प्रस्तावना लिहिलि आहे ती आयर्लंडच्या प्रसिद्ध लेखक वॉल्टर बी यिट्स यांनी.

 

आजही आयर्लंड आणि भारताचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध कायम आहेत. मात्र क्रिकेटच्या मैदानात विश्वचषकात दोन्ही देशांचे संघ एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत. यावेळी आयर्लंडला कमी लेखण्याची चूक कोणताच भारतीय करणार नाही. चिन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामनाही अगदी जबरदस्त होईल अशीच क्रिकेट फॅन्सना आशा वाटतेय.

 

त्याही पुढे जायचं तर आयर्लंडसाठी ही एक खूप मोठी संधी ठरणार आहे. एकीकडे झिम्बाब्वे, केनिया आणि बांगलादेशासारखे गडी कोसळतायत. आणि त्यात आयर्लंडची टीम दमदार कामगिरी बजावतेय. ही गोष्ट विसरता येणार नाही.

 

आयसीसी पुढच्या विश्वचषकात १४ ऐवजी दहाच टीम्स खेळवण्याच्या विचारात आहे. पण आयर्लंडसारख्या संघांवर त्यामुळं अन्याय होऊ शकतो. यावर उपाय म्हणजे विश्वचषकात खेळणाऱ्या संघांची रणजी ट्रॉफीप्रमाणे दोन गटांत विभागणी करता येईल.

 

आयसीसी काय निर्णय घेतेय ते मे महिन्यातच कळेल पण आयर्लंडच्या धडाक्यामुळं क्रिकेटचा खेळ आणखी Exciting बनलाय आणि नव्या सीमारेषा ओलांडतंय हे मात्र नक्की.

 

(BTW  यीट्स यांची एक कविता मला फार आवडते. खास करून त्यातल्या या ओळी :

Turning and turning in the widening gyre,

The falcon cannot hear the falconer;

Things fall apart; the centre cannot hold;

Mere anarchy is loosed upon the world

– “Second Coming”

आयर्लंडचा उदय म्हणजे सेकंड कमिंग ठरणार का? )