Category: Science Technology


v4_pr4ql.jpg

 डॉ. मिखाल कोशिन्स्की हा डेटा-संशोधक, त्याच्या संशोधन-क्षेत्राची माहिती देणारा “The data that turned the world upside down” हा लेख आणि त्याचं गिरीश कुबेरांनी केलेलं भाषांतर* गेले काही दिवस चर्चेत आहे.

फेसबुकसारख्या व्यासपीठावर लोकांच्या पोस्ट्स, लाईक्स आणि त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या आधारे तयार झालेला ‘बिग डेटा’ वापरून राजकारणी जनमत त्यांच्या बाजूनं वळवू लागले आहेत असं काहीसं भयावह चित्र या लेखानं निर्माण होतं.

गेल्या महिनाअखेरीस हा लेख vice  या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला होता. वाचल्यावर मीही उडाले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत असताना तिथल्या एका पत्रकारानं आणि एका जर्मन मित्रानंही मिखाल कोशिन्स्कीचा उल्लेख केला होता. तेव्हापासून या विषयाचा अभ्यास करते आहे, मिखालचे आधीचे काही लेखही वाचायला मिळाले आहेत. (होय, हा उच्चार मिखाल with ‘ख’ silent असा आहे- ‘मिहाल’ च्या जवळपास जाणारा, पण मायकल असा नाही..)  

माझ्या वाचनात आलेले आणि मला जाणवलेले काही मुद्दे इथं मांडते आहे.

aaeaaqaaaaaaaaijaaaajdnmndu4otk0lweyotatndc1my04m2qylwe4ngvlodu1zwixyq

  1. ‘बिग डेटा’चा खरंच निवडणुकीच्या किंवा जनमत चाचण्यांच्या निकालावर परिणाम होतो का?आणि होत असेल, तर भविष्यात बिग डेटाच्या आधारेच निवडणुका लढवल्या जातील का? सध्यातरी या प्रश्नाचं निश्चित उत्तर देता येणार नाही. पण डोनाल्ड ट्रम्प बिग डेटामुळं जिंकले किंवा ब्रेक्झिटचा कौल बिग डेटामुळंच लागला असं म्हणणंही सध्याच्या घडीला चुकीचं ठरतं.

स्वतः मिखाल कोशिन्स्कीनं ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत “डेटा निवडणूक जिंकत नाही, तर उमेदवारच जिंकतात” असं मत मांडलं आहे.

ट्रम्प यांच्याप्रमाणेच हिलरी क्लिंटन यांच्याकडेही बिग डेटा उपलब्ध होता आणि त्यांनीही डेटाच्या आधारे कॅम्पेनिंग केलं होतं. इतकंच काय, ट्रम्प यांच्याप्रमाणेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार टेड क्रूझनीही केंब्रिज अॅनालिटिका कंपनीचीच मदत घेतली होती, पण ते प्राथमिक निवडणुकीतच मागे पडले. ट्रम्प यांना अमेरिकेच्या ग्रामीण प्रदेशात, भौगोलिक ‘मिडवेस्ट’ राज्यांत राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनातल्या भावना कळल्या, ते त्यांचीच भाषा बोलू लागले आणि त्याच राज्यांवर लक्ष केंद्रीत करून निवडणूक जिंकली, हे वास्तव आहे. त्यासाठी बिग डेटाचीही गरज नाही. आपल्याकडचे राजकारणी बिग डेटा नसतानाही आपापला गड कसा राखतात? तसंच काहीसं आहे हे. 

अर्थात कुठला गड आपला आहे हे स्पष्ट कऱण्यात बिग डेटा मदत करू शकतो. त्यामुळं अशा डेटाशी निगडीत काम करणाऱ्या कंपन्यांना येत्या काही वर्षांत सुगीचे दिवस येणार हे नक्की आहे.

  1. ‘बिग डेटा’फसवाही असू शकतो. तसंच तो फक्त ट्रेण्ड दाखवतो. त्यामुळं डेटा अॅनालिस्ट्सच्या आणि ब्रँड बिल्डर्सच्या विश्वात सध्या बिग डेटापेक्षाही ‘small data’ जास्त महत्त्वाचा मानला जातो. 

बिग डेटा हा एका विशिष्ठ कालावधीत मोठ्या समूहाकडून माहिती जमा केल्यानं तयार होतो. तर स्मॉल डेटा म्हणजे एखाद्या छोट्या गोष्टीविषयीची विशिष्ठ/नेमकी आणि ताजी माहिती. आपलं मागचं उदाहरणच वापरून स्पष्ट करायचं तर, आपला गड राखण्यासाठी कुठला उपाय प्रभावी ठरेल, याविषयीची माहिती. लोकांना स्वप्न दाखवली, त्यांना आलेला राग कसा बरोबर आहे असं म्हटलं, त्यांना कशापासून तरी धोका आहे हे सांगितलं, तर ते आपल्यावर विश्वास ठेवतात हा ‘स्मॉल‘ डेटा ट्रम्पना आधी व्यवसायात आणि मग निवडणुकीत यश मिळवण्यासाठी कामी आला. 

(या स्मॉल डेटानं जग कसं बदललं आहे, हे सांगणारं एक पुस्तक ब्रँड एक्सपर्ट मार्टिन लिंडस्टॉर्मनं गेल्या वर्षी लिहिलं आहे. मला भारतात ते अजून मिळू शकलेलं नाही.)

  1. बिग डेटा’जमा करणाऱ्या कंपन्या त्याचा गैरफायदा घेऊ लागल्या तर त्यापासून कसं वाचायचं? 

फेसबुकच्या सुरुवातीच्या दिवसांत तुमचे लाईक्स सर्रास सर्वांना दिसत. त्यावेळी प्रायव्हसी सेटिंग्जही प्रभावी नव्हती. पण मिखाल कोशिन्स्कीचं संशोधन प्रसिद्ध झाल्यावर फेसबुकनं त्या गोष्टींत बदल केले. त्यासाठी कोशिन्स्कीची मदतही घेतली.

तुम्हाला आठवत असेल, तर फेसबुकवर सुरुवातीला खूप साऱ्या क्वीझ, गेम्सचा भडीमार होता. त्यात सहभागी व्हायचं तर तुम्हाला प्रोफाईलला फुल अॅक्सेस द्यावा लागायचा. अशा अॅप्समधूनच तुमच्याविषयीची माहिती गोळा केली जाते आणि बिग डेटा तयार होतो. त्यामुळं सर्वात आधी फेसबुकच्या सेटिंग्समध्ये जाऊन आपण कुठल्या अॅप्सना फ्री अक्सेस दिला आहे, हे चेक करा, अनावश्यक अॅप्स काढून टाका आणि दुसरं म्हणजे अधूनमधून डिजिटल ब्रेक घेत जा.

  1. स्वतः गुगल आणि फेसबुकही अशा बिग आणि स्मॉल डेटाचा फायदा उठवतातच. फेसबुक रोज सकाळी विशिष्ठ अल्गोरिदमनुसार विशिष्ठ आठवणी उपसून वर काढतं, आपल्या विचारांवर त्याचा परिणाम होतोच की. आपण ज्या पोस्टस लाईक करू किंवा अगदी जो विषय गुगलमध्ये सर्च करू, त्याच्याशी निगडीत जाहिराती फेसबुकवर दिसू लागतात. गुगलचं पर्सनलाईज्ड सर्च इंजिन सुद्धा काहीसं असंच वागतं. त्यामुळं बहुतेक वेळा incognito mode मध्ये सर्च करणं, वेब ब्राऊजरमधली History, Cache डिलीट करणं अशा सवयी फायद्याच्या ठरतील. 
  2. बिग डेटा फक्त सोशल मीडियापुरता मर्यादित नाही. तो कुठूनही जमा केला जाऊ शकतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपांत. म्हणजे हजारो लोकांनी एखाद्या विशिष्ठ कामासाठी केलेले अर्जही बिग डेटा बनू शकतात. प्रत्यक्ष कागदपत्रांची वाहतूक सोपी नसल्यानं अशा बिग डेटाचा गैरफायदा घेण्याच्या घटना तुलनेनं अगदी तुरळक आहेत आणि याच कारणांमुळं टोटल डिजिटायझेशनला अनेकांचा विरोध आहे. विशेषतः भारतासारख्या देशात, जिथं डेटा स्वस्तात उपलब्ध होतो, डेटा सर्व्हर्सवर हॅकर्सचे हल्ले कठीण नाहीत आणि मूळात डिजिटल व्यवहारांविषयी बहुतांश लोक अजूनही अनभिज्ञ आहेत.
  3. Demonetizationनंतर तर बिग डेटाचा गैरवापर होण्याची भीती आणखी वाढली आहे. कारण कॅशलेस इंडिया आणि डिजिटल व्यवहारांवर भर दिला जातो आहे. त्यामुळं माझ्या मनात प्रश्न उभा राहिला आहे – उदाहरणार्थ, तुम्ही क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्यातून जमा झालेली माहिती एखाद्याच्या हाती लागली तर – तुमचं उत्पन्न, तुम्ही कुठं काय आणि किती खरेदी करता, वाणसामानाच्या बाबतीत वर्षातून एकदा खरेदी करता की महिन्यातून की, आठवड्याला, यावरून तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी,तुम्ही जेवण बनवण्याच्या बाबतीत आळशी आहात की नीटनेटके याविषयी ढोबळ निष्कर्ष काढता आला तर? डेटा-अॅनालिस्ट मित्राचं उत्तर – होय हे शक्य आहे. 
  4. भारत सरकारनं कॅशलेस व्यवहारांसोबतच आधार कार्ड, डिजिटल लॉकरची योजना लागू केली आहे. पण इथंही तीच भीती आहे. त्यामुळं आधार कार्डला अनेकांनी वेळोवेळी विरोध केला आहे. ( सर्वोच्च न्यायालयातील केसेस, सुचेता दलाल यांचे लेख)

आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र नाही, तर डेमोग्रॅफिक आणि बायोमेट्रिक माहिती जमा करणारी यंत्रणाही आहे. उद्या माझी सर्व अकाऊंट्स मी आधार कार्डशी जोडली तर त्या डेटाच्या सुरक्षिततेची किती खात्री देता येईल? हा डेटा कदाचित विकला जाणार नाही, पण कुणा हॅकर्सच्या हाती लागला तर? आधार कार्डवरून बँक अकाऊंट्स आणि बँक अकाऊंट्सवरून पैसे खर्च करण्याच्या सवयीपर्यंत पोहोचता येतंच की.

  1. याच कारणांसाठी मी व्यक्तिशः ओला/उबरसारख्या टॅक्सी सर्व्हिसेसही वापरणं टाळते. कारण तिथं जमा होणाऱ्या एरिया, लोकेशन यांसारख्या बिग आणि स्मॉल डेटाचा गैरवापर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मी कुठे जाते, यावरून माझ्या स्वभावाविषयी कोणी आडाखे बांधलेले मला नाही आवडणार. आणि एखाद्या व्यक्तीची नेहमीची जाण्यायेण्याची ठिकाणं माहिती झाली तर ती व्यक्ती हल्लेखोरांसाठी, स्टॉकर्ससाठी ईझी टारगेट बनू शकते.

या सगळ्या मुद्द्यांवर अधिक सखोल संशोधन करून मगच काहीतरी लिहावं असं मनात होतं. पण लोकसत्तामध्ये आलेलं भाषांतर पाहून आत्ताच माझ्या नोट्स मी इथे शेअर केल्या आहेत.   

………………..

* खरं तर मला गंमत वाटते आहे सगळ्या प्रकाराची.  लोकसत्ताचा प्रिंटमधला लेख मी वाचलेला नाही. पण ऑनलाईन एडिशनमध्ये तरी मूळ लेखाचा उल्लेख आहे. त्यामुळं थेट plagiarismचा आरोप करता येणार नाही.  तरीही या लेखाचा ‘कुबेरांचा लेख’ असा उल्लेख खटकतोच. 

आधी एका जर्मन मासिकात आणि त्यानंतर vice.com या वेबसाईटवर इंग्रजीमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला होता. आता एखादा लेख जसाच्या तसा किंवा त्याचा गोषवारा मराठीत आणण्यास हरकत नाही. पण हे भाषांतर आहे हे आणखी स्पष्टपणे – बायलाईनमध्येही सांगता आलं असतं. मूळ जर्मन लेखाचं इंग्रजीत भाषांतर करताना हीच खबरदारी घेण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी केवळ काही ओळी जशाच्या तशा उचलल्या म्हणून सीएनएनच्या फरिद झकारियावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आपण मात्र कॉपिराईट्स आणि Plagiarism बाबत उदासीनच असल्यासारखं वाटतं. 

मराठी वृत्तपत्र वाचणारा वाचक टेकसॅव्ही आणि इंग्लिश वाचणारा नाही अशा (गैर)समजामुळं तर असं झालेलं नाही ना? 

पत्रकारांनीच भान ठेवायला हवं. कुठलीच गोष्ट लपून राहात नाही कारण ‘कुणीतरी आहे तिथं.. ‘ 

– जान्हवी मुळे

Advertisements

अमेरिकेचा इतिहास जगणारं बोस्टन, अमेरिकेच्या आर्थिक संपन्नतेचं प्रतीक न्यूयॉर्क आणि महासत्तेचं सत्ताकेंद्र वॉशिंग्टन डीसी. तीन आठवड्यांच्या सुट्टीदरम्यान अमेरिकेतल्या या तीन शहरांनी आणि त्यांदरम्यानच्या प्रवासानं मला या देशाचं बदलतं रूपही दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर झालेली राजकीय उलथापालथ अनुभवण्याची संधी मला मिळाली. त्यातलेच काही अनुभव मी ब्लॉगच्या माध्यमातून मांडले होते. पण काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या. माझ्या प्रवासातली अशीच काही टिपणं या ब्लॉगमध्ये मांडते आहे.

कलेचं राजकारण

बोस्टनचं म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स म्हणजे कलाप्रेमींसाठी अलिबाबाची गुहाच आहे. अमेरिकन, युरोपियन, आशियाई कलेचे उत्तमोत्तम नमुने तिथं मांडण्यात आले आहेत. क्लॉद मोने, पाब्लो पिकासो, जॉर्जिया ओ’किफी, जॉन सिंगर सार्जंट, थॉमस सली अशा दिग्गजांचा कलाविष्कार पाहण्याची संधी या संग्रहालयात मिळते. ते केवळ संग्रहालय नाही, तर तिथं एक आर्ट स्कूलही चालवलं जातं. साहजिकच इथल्या कलादालनांची सफर करताना कधी परीक्षण-समीक्षण करणारे विद्यार्थी, त्यांना कलाकृतींचं महत्त्व समजावणारे शिक्षक, रेखाटनं करणारे तरुण कलाकारही भेटतात.

या संग्रहालयातल्या ‘ट्रायम्फ ऑफ द विंटर क्वीन’ या पेंटिंगनं माझं लक्ष वेधून घेतलं. इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची कन्या एलिझाबेथ स्टुअर्टची कहाणी सांगणारं पेंटिंग. एलिझाबेथ बोहेमियाची राणी बनली, मात्र वर्षभरातच तिचा पती फ्रेडरिकला सत्ता सोडावी लागली. (म्हणूनच तिला ‘विंटर क्वीन’ हे नाव पडलं) देशोधडीला लागलेलं एलिझाबेथचं कुटुंब प्रेम, युद्ध, विरह, मृत्यू यांचा सामना कसं करतं, ते हे पेंटिंग दर्शवतं.

Janhavi_Blog_Photo_1.jpg

हे चित्र रेखाटण्यात आलं, तेव्हा एलिझाबेथ विस्थापितांचं आयुष्य जगत होती. पण तिच्या मृत्यूपश्चात तिचा नातू जॉर्ज इंग्लंडच्या सिंहासनावर विराजमान झाला. 1714 साली जॉर्ज पहिला सत्तेत आल्यानंतरच इंग्लंडनं खऱ्या अर्थानं जगावर राज्य करण्यास सुरूवात केली. इंग्लंडचं सध्याचं राजघराणं त्याच जॉर्जचे वंशज आहेत.

माझ्यासोबतच काही विद्यार्थी त्या पेंटिंगचा अभ्यास करत होते. त्यांच्या शिक्षकांनी, इथन यांनी मांडलेला एक विचार मनात घर करून राहिलाय.

‘प्रत्येक चित्र, अगदी एखादं व्यक्तीचित्रही एक कहाणी सांगतं. फक्त त्यातल्या व्यक्तींची कहाणी नाही, तर त्या काळातल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीची कहाणीही चित्रात शोधण्याचा प्रयत्न करा. एलिझाबेथच्या आणि तिच्या मुला-मुलींच्या चेहऱ्यांवरचा प्रकाश, दिवंगत फ्रेडरिकमागचा कवडसा जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच या चित्रातला अंधारही महत्त्वाचा आहे. एलिझाबेथच्या रथाखाली मृत्यू चिरडला जातो आहे. अशा अंधारलेल्या जागाच एखाद्या कलाकृतीचं खरं रूप दाखवतात. एक विस्थापित राणी हार मानत नाही, तिचेच वंशज पुढं जगावर राज्य करतात.’

एका विद्यार्थ्यानं त्यावर पटकन टिप्पणी केली, ‘We should show this painting to a certain Mr. Trump.’ ट्रम्पना हे चित्र दाखवायला हवं. आम्ही सगळेच हसलो. पण खरंच, ट्रम्पना आणि युरोपातल्या अनेक नेत्यांना हे चित्र दाखवायला हवंच.

कलाकार, शास्त्रज्ञ आणि राजकारणी

बोस्टनचं म्युझियम ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानप्रेमींसाठी मोठी पर्वणी आहे. वैज्ञानिक सिद्धांत साध्या-सोप्या भाषेत अगदी लहान मुलांनाही समजतील अशा पद्धतीनं इथं समजावून सांगितले जातात.

या संग्रहालयाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे थिएटर ऑफ इलेक्ट्रिसिटी. वीजेवर संशोधन करणारे बेंजामिन फ्रँकलिन बोस्टनचेच रहिवासी होते. त्यांच्या भूमीत वीजेची गुपितं उघड करणारं हे दालन आहे. वीजेचा नाच आणि त्यातली अचाट शक्ती पाहण्याची संधी इथं मिळते. आणि हो, या दालनाचं अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही जवळचं नातं आहे.

janhavi_blog_photo_2

डोनाल्ड ट्रम्प यांचे काका डॉ. जॉन जी ट्रम्प हे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटीमध्ये प्रोफेसर होते. डॉ. ट्रम्प यांनी हाय व्होल्टेज रेडिएशनवर, किरणोत्सारावर काम केलं होतं. त्यांच्या एक्स रे जनरेटर्सचा फायदा कॅन्सर पेशंट्सना झाला. एक मनमिळावू, हसतमुख आणि शांत स्वभावाचा शास्त्रज्ञ अशी जॉन ट्रम्प यांची प्रतिमा होती. (पुतण्या काकांवर गेला असता तर, असा विचार मनात आल्याशिवाय राहात नाही.)

johngtrumpतर याच जॉन ट्रम्प यांचं थिएटर ऑफ इलेक्ट्रिसिटीच्या उभारणीला हातभार लावला होता. तिथला वीजेवरचा शो पाहताना माझ्या गटातला एका जेमतेम १० वर्षांचा मुलगा – मॅट, त्याच्या वडिलांना पीटरना, बेंजामिन फ्रँकलिनविषयी विचार होता. बेंजामिन फ्रँकलिन केवळ संशोधक नव्हते, तर एक राजकारणीही होते. फ्रँकलिन यांनी अमेरिकेच्या निर्मितीलाही हातभार लावला होता. तीच कहाणी वडिलांनी मुलाला ऐकवली. आम्ही सगळेजण वीजेवरचा शो संपल्यावर पुढच्या दालनातील लिओनार्डो डा विंचीवर आधारीत प्रदर्शन पाहायला गेलो. डा विंचीनं दिलेल्या आराखड्यांवर आधारीत सायकल, हेलिकॉप्टर, ग्लायडर्स अशा मशीन्सची मॉडेल्स तिथं मांडण्यात आली आहेत. आणि अर्थातच मोनालिसा, द लास्ट सपर यांसारख्या पेंटिंग्सची रहस्य उलगडणारी माहितीही तिथं मिळते.

मॅटचे प्रश्न सुरूच होते. ‘डा विंची तर आर्टिस्ट होता, मग सायन्स म्युझियममध्ये त्याचं काय काम?’ पीटरनं मॅटला डा विंची कसा प्रतिभावान होता, कलेसोबतच त्याला विज्ञानाची आवड कशी होती ते सांगितलं. मॅटचा पुढचा प्रश्न अगदी भन्नाट होता – ‘Why don’t we also have artists who are scientists and scientists who are politicians?’ मॅटच्या त्या प्रश्नानं आम्हा सर्वांनाच निरुत्तर केलं. पीटरनं मॅटला जवळ घेत म्हटलं,‘Why don’t you try to be one?’ मॅट खळखळून हसला.

मॅटच्या लकाकणाऱ्या डोळ्यांत मला अमेरिकेचं भविष्य हसताना दिसलं.

– जान्हवी मुळे

http://abpmajha.abplive.in/blog/america-after-donald-trumps-selection-art-science-and-politics

 

कर्जत परिसरात सध्या महामार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आणि त्यासाठी झाडांवर कुऱ्हाड पडते आहे.

चांगले रस्ते हवेत, विकास हवा, तर काही वेळा वृक्षतोड टाळता येत नाही. विकासाला माझा विरोध नाही. पण गरज नसताना जेव्हा झाडांची सर्रास कत्तल होते, तेव्हा खरंच डोक्यात तिडीक जाते. असाच प्रकार आमच्या शेताजवळ घडलाय. आणि त्यात एका दुर्मिळ वृक्षाचा बळी गेलाय.

20140422_090331

 

हे नांदुरकी चं झाड माझ्या बाबा, काकांच्या लहानपणापासून म्हणजे किमान साठ वर्ष उभं होतं. कर्जत-भिसेगाव परिसरात अशी दोनच मोठी झाडं शिल्लक होती. एक  रेल्वे गेटजवळ, जे आता अस्तित्वात नाही. आणि दुसरं आमच्या हद्दीवर, ज्यावर सोमवारी कुऱ्हाड चालली.


20140422_090239

खरंतर विकासकामांसाठी, आणि एरवीही जंगलात कुठलीही झाडं तोडण्यापूर्वी वनखात्याची परवानगी आवश्यक असते. त्यासाठी वनखात्याकडून आधी पाहणीही केली जाते. ज्यांच्या हद्दीतील झाडं तोडली जाणार आहेत, किंवा ज्यांची जागा जाणार आहे त्यांना नोटीस दिली जाते. वनखात्याच्या पाहणीत जी झाडं तोडायची आहेत त्यावर नंबर टाकले जातात. आणि जी झाडं तोडायची नाहीत, किंवा वाचवायची आहेत त्यांवर फुली मारली जाते. झाडं तोडण्याचं काम खासगी कंत्राटदाराला दिलं जातं.

20140422_090309

नांदुरकीच्या या झाडावरही फुली मारण्यात आली होती. मात्र कंत्राटदारानं बेधडकपणे झाड तोडलंय. नशीब, त्याचं मशीन बंद पडलं, आणि शेजारचं वावळाचं झाड आणि दोनशे वर्ष जुनी आंब्याची दोन झाडं वाचली. (आमच्या शेतावर राहणाऱ्यांना कल्पना नव्हती, की ती झाड राखीव आहेत.)

माझे काका दुपारी घरी आले होते. संध्याकाळी शेतावर परत गेल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी लगेचच कर्जतच्या वन विभागात फोन लावला. काल मीही शेतावर गेले होते, काही स्पष्टीकरण मिळालं नाही तर पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीनं. अर्थात कर्जतचे वनअधिकारीही या घटनेनं नाराज आहेत आणि यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी त्यांनी तातडीनं पावलं उचलली आहेत.

पण काही झालं, तरी पाडलेला वृक्ष तर आता उभा नाही राहू शकत ना पुन्हा… आमच्या प्रवेशद्वाराजवळ राखणदारासारखा उभा होता तो एवढी वर्ष. आणि म्हणूनच त्याची ही अवस्था लक्षात आली लगेचच. पण अशी कित्येक झाडं विनापरवानगी तोडली जात असतील, अशी शंकाही उभी राहिली आहे. आणि म्हणूनच हा ब्लॉगप्रपंच.

आपल्या आसपास, एखादं झाड तोडलं जात असेल, तर झाड तोडणाऱ्याकडे तशी परवानगी आहे का, याची खातरजमा करून घ्या. आपल्या हद्दीतलं झाड तोडलं जाणार असेल, तर आधी त्याचा मोबदला घ्यायला विसरू नका. असा मोबदला देणं टाळण्यासाठी दुसऱ्या बाजूची सरकारी हद्दीतली राखीव झाडं तोडली जातात अशी तक्रार कानावर आहे. झाडांची तस्करी होत नाही ना, हेही तपासून पाहायला हवं.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी दुसरी झाडं लावल्याशिवाय झाडं तोडण्याची परवानगीच देऊ नये वनखात्यानं..

20140422_093303

A comet is coming!

The comet ISON (or C/2012 S1, also known as Comet Nevski–Novichonok) was discovered on 21 September 2012 by Vitali Nevski (Belarus) and Artyom Novichonok (>Russia)

250px-ISON_Comet_captured_by_HST,_April_10-11,_2013The comet will be very close to Sun on Nov. 28. Scientists and skygazers are interested in knowing what will happen to it? There are 3 possibilities

1.       If it’s tough enough to survive the passage of the sun, we’ll get to see it with naked-eye in the early morning sky in the first week of December. 

2.       The sun could actually pull it apart.  So it becomes several chunks rounding the sun and putting on a great show again in early December

3.        If the comet is very weak, it could break up into a cloud of dust and be a complete bust in December.

The comet iscoming from the very edge of our solar system so it stills retains the primordial ices from which it formed four-and-a-half billion years ago.  It’s been traveling from the outer edge of the solar system for about five-and-a-half million years to reach us in the inner solar system.

Comet ISON approaching Sun- video taken by NASA’s STEREO spacecraft (we can download this one from You Tube with credit to NASA)

https://www.youtube.com/watch?v=nZi4Ecu_cfY

All about Comet ISON http://www.nasa.gov/ison/#.UpWjadIW2qh

Source: NASA

दुष्काळाविषयी बोलताना मी मैदानांना पाणी बंद करणं चुकीचं ठरेल असं मत मांडलं. त्यावरून एक तिखट प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. ‘तुम्ही मुंबईकर, तुम्हाला दुष्काळ काय माहित?’

खरं सांगायचं तर मी मूळची मुंबईकर नाही. आमच्या कर्जतमध्येही पाण्याचा मोठा प्रश्न होता. पावसाळ्यात पूर आणि उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण अशी परिस्थिती असायची. नगरपालिकेचं पाणी यायचं, पण ते कधीच पिण्यायोग्य नसायचं. कर्जतला पूर्वी पळसदरीच्या तळ्यातून पाणीपुरवठा व्हायचा, जे ब्रिटिशांनी रेल्वेसाठी बांधलं होतं. टेकडीवर पाण्याची टाकीही बरीच जुनी. गाव वाढून शहर झालं, पण Two days, two storiesपाण्याची सोय केलेली नव्हती. म्हणजे काही योजना कागदावर पडून होत्या. पण त्या अंमलात कधी येणार याची कर्जतकर वाट पाहायचे. गावात विहिरींमुळे पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती.

पण घरं, वाडे पाडून मोठ्या इमारती उभ्या राहू लागल्या, तसं विहिरी बुजवून बोअरवेची संख्या वाढली. आणि विहीरींचे झरेही त्यामुळे आटू लागले. साधारण १५-१६ वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रश्नाची झळ विहिरीवाल्या घरांनाही बसू लागली.  झाडांसाठी, साफसफाईसाठी नगरपालिकेचं पाणी वापरलं जायचं. पण पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळवणं जिकीरीचं बनलं. आमच्या घरी तर गाई-गुरं आणि पाहुण्यांचाही राबता असायचा. शेजार-पाजारचेही विहिरीवरून पाणी न्यायला यायचे उन्हाळ्यात. विहिरीचा केवळ एकच झरा मोकळा होता. बाकी आटलेले.

तास- दोन तास वाट पाहिल्यावर विहिरीत बादलीभर पाणी साठायचं, तेच काढून पिण्यासाठी स्वयंपाकासाठी वापरलं जायचं. अनेकदा पाण्यावर लक्ष ठेवायचं, ते काढायचं काम मीही केलं आहे. टँकरनं आलेल्या पाण्यासाठी उडणारी धांदल मलाही माहित आहे. पाण्याअभावी सुकणारी झाडं, तळमळणारी जनावरं पाहिली आहेत. आजोळी नागावला गेल्यावर तर डोक्यावर हंडा-कळशी घेऊन खेपा घालाव्या लागायच्या.

शेतावरची परिस्थिती तर आणखी बिकट. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणा-या मोरबे डॅमपासून हाकेच्या अंतरावर असणारा हा प्रदेश, पण लोकांना पाण्यासाठी मैलोनमैल चालताना पाहायचे. आजही काही आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचा नळ नावाचा प्रकार अस्तित्वातच नाही.

अर्थात आज तुम्ही कर्जत शहरात आलात तर चित्र बरंच बदललं आहे. आज पाणीटंचाई जणू उरलेलीच नाही. शहराला पाणीपुरवठा करणारी नवी योजना अखेर अस्तित्वात आली आहे. पेज नदीचं पाणी मोठ्या टाकीत साठवून वर्षभर पुरवलं जातं.

ही परिस्थिती पाहिल्यावर एक गोष्ट लक्षात येते, पाण्याचा प्रश्न टंचाईमुळे नाही, तर नियोजनातल्या अभावामुळेच निर्माण झाला आहे. पाण्याची साठवण, पुरवठा करणारी सक्षम व्यवस्था असेल तर दुष्काळाची झळ कमी करता येऊ शकते. यंदाचे दोन महिने काढणं कठीण जाईल, पण पुन्हा अशी स्थिती येऊ द्यायची नसेल, तर आतापासूनच विचार करायला हवा.  किमान कर्जतसारख्या भागात जिथे पाऊस मेहेरबान आहे, तिथे पाण्याचं योग्य नियोजन व्हायलाच हवं. केवळ धरणं बांधून हा प्रश्न सुटणार नाही, हे मराठवाड्यात सिद्ध झालं आहेच.

 

 

Oh God!

Everyday, In my inbox, I get a few newspapers from around the world. It’s interesting to go through all those headlines. Different people in different parts of the world look at the things with a different perspective- gives an idea of the real world outside. It is indeed fascinating to see our world growing in all directions. .

Today, as I sipped on a cup of coffee, three stories in the email caught my attention. First one was about the Conclave in Vatican to select the new Pope. Second one discussed research about Higgs Bosson- the so called “God Partical” and third one announcing the claims of a Baby being cured of HIV.

So, There are some people who believe in God, Some are searching for the God and Some trying to conquer him in a way.

Whether one has faith or not, the idea of God is incredible.
There are certain things out of our reach and science may lead us to their cause some day. Still, God will continue to be here. For this idea- that there exists something beyond everything makes many things bearable. Call it Nature or God, call it destiny or co-incidence, Scientific principle or Supreme Power, acceptance of something greater relieves us of pain.

“झाडं लावली की कसं, रोज फळं मिळतायत.”

“मी तर स्ट्रॉबेरीच लावणारेय”

“मला तर राईस आवडतो, छान दिसते भातशेती..”

“चला, गाईंचं दूध काढण्याची वेळ झाली…”

“मला लाईम ट्री पाठव ना..”

ही चर्चा रंगली आहे आधुनिक शेतक-यांमध्ये. पण कुठल्या गावच्या पारावर नाही, तर फेसबुकच्या ऑनलाईन चावडीवर.. अर्थातच, या गप्पा ख-याखु-या शेतीविषयी चाललेल्या नाहीत, तर फार्मविल या फार्मिंग गेमविषयी सगळे बोलतायत.

आजकाल फेसबुकवर सगळ्यांनाच फार्मविल या गेमची भुरळ पडलेली दिसतेय. (माझाही अपवाद नाही…) फेसबुक यूजर्सना, या गेमच्या माध्यमातून व्हर्च्युअल फार्मिंग करता येतं. क्यूट ग्राफिक्स, अगदी खरे वाटावेत असे साऊंड् इफेक्टस यामुळं फार्मविल दिसायला आणि खेळायलाही अगदी छान वाटतं.

या आभासी दुनियेत, एंट्री घेणारा प्रत्येक खेळाडू आहे एक फार्मर. सुरूवातीला गेममध्ये लॉग इन केल्यावर प्रत्येक फार्मरला काही जमीन आणि बी-बियाणं विकत घेण्यासाठी कॉइन्स मिळतात. त्याचा वापर करून तुम्ही व्हर्च्युअल शेती करू शकता. म्हणजेच बी पेरणं, ते उगवणं, पिक काढणं, गाई-गुरांची काळजी घेणं, सारं काही… काही पिकं चार तासांत तयार होतात, काहींना दोन, चार दिवस लागतात. जसजसं उत्पन्न वाढतं, तसं फार्मर्स वरच्या लेव्हलवर पोहोचतात. त्यांना नवी जमीन विकत घेता येते, जास्त उत्पन्न देणारी पिकं, झाडं लावता येतात. तुम्ही आपली शेती सजवण्यासाठी एखादं तळं, पिकनिक सेट, वेगवेगळ्या प्रकारची कुंपणं विकत घेऊ शकता. आणि हो, तुमचे मित्रही फार्मविलवर असतील, तर या सगळ्या गोष्टी त्यांना फ्री-गिफ्ट म्हणूनही पाठवू शकता. (लहानपणी नवा व्यापार, बिझनेस सारखे खेळ असयाचे ना, तसंच.)

फार्मविल गेम लॉन्च झाला १९ जूनला. त्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात, फार्मविल म्हणजे फेसबुकवरचं सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप्लिकेशन बनलंय. फक्त फेसबुकवर नाही, तर एकूणच सोशल नेटवर्किंग अॅप्लिकेशन्समध्ये आता फार्मविल आघाडीवरेय. जवळजवळ साडेतीन कोटींहून जास्त लोक फार्मविलमध्ये व्हर्च्युअल शेती करतायत. पण फार्मविलबरोबरच बार्न बडी, फार्म टाऊन, फार्म लँड या आणि अशा इतर फार्मिंग गेम्सचा विचार केला तर, हा आक़डा साडेसात कोटींपर्यंत जातो. आणि दररोज, त्यात भरच पडतेय. (संदर्भ- http://www.allfacebook.com/ )

विशेष म्हणजे प्रत्यक्षात शेती-उद्योग संकटात सापडला असताना, इंटरनेटवर मात्र शेतक-यांची संख्या वाढतेय. फार्मविलमध्ये व्हर्च्युअल शेती करताना आठवण येते माझ्या गावाची, तिथल्या जुन्या वाड्याची ज्याच्या जागी आता नवं घऱ बांधलंय. मुंबईच्या जवळच्या माझ्या गावात शेतीचं प्रमाण घटत चाललंय. शेतजमीनी एन-ए (नॉन-अॅग्रीकल्चरल) करून घेण्याकडे लोकांचा कल वाढतोय.

अर्थात त्यामागेही काही कारणं आहेतच. शेती करणं इंटरनेटवर सोपं आहे, पण प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळंच आहे. बेभरवशाचा पाऊस, सरकारची दूरदृष्टीहीन धोरणं, कष्टमय आयुष्य, कोणतीही पेन्शन नाही. शेतकरी असणं, त्यातही अल्पभूधारक, म्हणजे सोपं नाही गड्या! पण बहुतेकजण या वास्तवापासून अनभिज्ञ नाहीत.

आणि तरीही, ऑनलाईन गेममध्ये का होईना, शेतीमधला लोकांचा रस वाढतोय. हे ही नसे थोडके! अपना तो यही सपना है.. इंटरनेटवरच्या फार्मिंगसारखी प्रत्यक्षातली शेतीही सोप्पी होऊ दे…