Category: History


obama

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीचा लेखा-जोखा इतिहासकार कसा मांडतात, हे आत्ताच कदाचित सांगता येणार नाही. पण ओबामांचे टीकाकारही एक गोष्ट मान्य करतील. ओबामा हे अतिशय उत्कृष्ठ वक्ता आहेत. त्यांचं भाषण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे नसतात, तर त्यात काही ना काही विचार मांडलेला असतो आणि ऐकणाऱ्यांना प्रेरणा मिळाल्याशिवाय राहात नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्यानं ओबामांनी केलेली काही महत्त्वपूर्ण भाषणं एकदा पुन्हा ऐकण्याची ही योग्य वेळ ठरावी..

1. ‘ए न्यू बिगिनिंग’ – ४ जून २००९, कैरो

ओबामा सत्तेत आल्यापासून, अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष आणि बदलाची नवी आशा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. विशेषत: त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळाता. त्याच सुमारास कैरो विद्यापीठातील आपल्या भाषणाद्वारा ओबामांनी मुस्लिम जगताकडे मैत्रीचा हात पुढे केला होता. मुस्लिमविरोधी प्रतिमा असलेल्या अमेरिकेचा बदलता दृष्टीकोन म्हणजे काही काळ जागतिक शांततेची नवी आशा ठरला होता. दुर्दैवानं ती आशा फार काळ टिकू शकली नाही.

2. नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण, १० डिसेंबर २००९

कैरो विद्यापीठातील भाषणाद्वारा ओबामांनी मांडलेल्या विचारांमुळंच त्यांची २००९ सालच्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी निवड झाली. त्यावरून वादही निर्माण झाला. पण ओबामांना हा पुरस्कार त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून नाही, तर त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांसाठी देण्यात आला होता. आपल्या भाषणात ओबामांनी त्या जबाबदारीची जाणीव ठेवली. युद्ध आणि शांततेविषयीचे विचारही ओबामांनी त्या भाषणाद्वारा मांडले होते. प्रत्यक्षात मात्र ओबामांना युद्धांतून लवकर माघार घेता आली नाही, किंबहुना अमेरिका वेगळ्या तऱ्हेनं नव्या युद्धांमध्ये ओढली गेली.

3. ओसामाच्या मृत्यूची घोषणा.  १ मे २०११, वॉशिंग्टन डीसी

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकी नेव्ही सील्सच्या टीमनं मारल्याची घोषणा ओबामांनी या भाषणाद्वारे केली होती. टीव्हीद्वारा राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण जेमतेम ९-१० मिनिटांचं होतं. तेवढ्या कमी वेळेत, नेमक्या शब्दांत ओबामांनी आपल्या भावना मांडल्या होत्या. ना विजयाचा जल्लोष, ना घोषणाबाजी, ना मी हे केलं असा आव.

4. समलिंगी संबंधांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ावरील प्रतिक्रिया. 26 जून 2015

ओबामांनी कारकीर्दीच्या सुरुवातीला समलिंगी व्यक्तींच्या हक्कांविषयी बोलणं टाळलं होतं. पण पुढं त्यांचे विचार बदलत गेले. ओबामांच्या कार्यकाळातच अमेरिकेच्या सर्व राज्यांत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली. सर्वोच्च न्यायालयानं तसा निर्णय दिल्यावर ओबामांनी केलेलं भाषण त्यांच्या मनातल्या आदर्श समाजाचं प्रतिबिंब दाखवतं.

5. सेल्मा, ७ मार्च २०१५

अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या समान हक्कांसाठीच्या लढ्यादरम्यान सेल्मा इथं झालेल्या रक्तपाताच्या घटनेला गेल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळी ओबामांनी केलेलं भाषण अमेरिकेत आजही वर्णद्वेश अस्तित्वात आहे या वास्तवाची जाणीव करून देणारं ठरलं.

6. अमेझिंग ग्रेस – २६ जून २०१५, चार्ल्सटन

चार्लस्टनमध्ये दंगल भडकवण्याच्या उद्देशानं वर्णद्वेषी हल्लेखोरानं चर्चमध्ये केलेल्या गोळीबारात स्टेट सीनेटर क्लेमेंटा पिंकनी यांच्यासह 9 कृष्णवर्णीयांचा बळी गेला होता. त्यांना आदरांजली वाहताना ओबामांनी अमेझिंग ग्रेस गाण्यास सुुरुवात केली.

7. सँडी हूक, 5 जून 2016

सँडी हूकमधील गोळीबाराच्या घटनेनंतर बोलताना ओबामांना अश्रू आवरले नव्हते. अमेरिकेत गन लायसन्सविषयी नियम कडक करण्याची गरज ओबामांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. अमेरिकेतली गन लॉबी आणि तिचा राजकारण्यांना असलेला पाठिंबा यांमुळं ओबामांना आपल्या कार्यकाळात बंदुकांच्या वापरावर निर्बंध आणता आले नाहीत. या एका गोष्टीचं शल्य त्यांना पुढेही जाणवत राहील.

8. राष्ट्राध्यक्ष म्हणूनअखेरचं भाषण – १० जानेवारी २०१७, शिकागो

शिकागोमध्ये, जिथून ओबामांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली, त्याच शहरात ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपलं अखेरचं भाषण केलं. ट्रम्प यांच्या निवडीनंतरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात हे भाषण सर्वसामान्यांना दिलासा देणारं ठरलं.

 

 

Advertisements

statue-of-liberty-1-580x395

लोकशाहीच्या अनेक व्याख्या केल्या जातात. पण लोकशाहीचं सर्वात मोठं लक्षण आहे- विरोधी पक्षाला आपली बाजू मांडण्याचं स्वातंत्र्य आणि सर्वसामान्यांना विचार स्वातंत्र्य मिळणं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेत याच विचार स्वातंत्र्यावर गदा येईल की काय अशी भीती अनेकांना वाटते आहे. कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट्सच्या पुरस्कार सोहळ्यात सीएनएनची दिग्गज पत्रकार ख्रिस्तियन अमानपोरनं तर म्हटलंच आहे- “अमेरिकेत पत्रकारांच्या विचारस्वातंत्र्य आणि सुरक्षिततेची मागणी करण्याची वेळ माझ्यावर येईल असं मला कधी वाटलं नव्हतं.”

ख्रिस्तियनच्या मनातली भीती अनेकांनी बोलून दाखवली, विशेषतः न्यूयॉर्कमध्ये. पण त्याचवेळी त्या भीतीचा सामना करण्याची ताकदही अमेरिकेत आहे, असा आशावादही दिसून आला.

statue-of-liberty

न्यूयॉर्कची ओळख असलेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी – स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा – पाहायला गेले होते, तेव्हाची गोष्ट. हडसन नदीच्या खाडीत लिबर्टी बेटावरचा हा भव्य पुतळा म्हणजे फ्रान्सनं अमेरिकेला दिलेली भेट आहे. अमेरिकन राज्यक्रांतीनंच फ्रेन्च राज्यक्रांतीला प्रेरणा दिली होती आणि या दोन देशांमधल्या क्रांतीनंच आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाया घातला होता. आज अमेरिकेत आणि फ्रान्समध्येही लोकशाहीचा पाया डळमळीत झाल्याचं चित्र असताना या पुतळ्याविषयी लोकांना काय वाटत असावं असा प्रश्न पडला.

मॅनहॅटन मागे सोडून बोट जशी या पुतळ्याकडे जाऊ लागते, तसं आपणही इतिहासात मागे जात असल्यासारखं मला वाटलं. पुतळ्याच्या भव्यतेनं थक्क व्हायला झालंच, पण त्याहीपेक्षा लक्ष वेधून घेतलं ते तिथं जमलेल्या गर्दीनं. दररोज जगाच्या कानाकोपऱ्यातले हजारो लोक या पुतळ्याला भेट देतात. माझ्यासोबतच्या गटातली माया मॅनहॅटनची रहिवासी आहे आणि एका आर्ट गॅलरीसाठी काम करते. माया आपल्या मुलाला हा पुतळा दाखवण्यासाठी घेऊन आली होती. “मला येता-जाता अनेकदा हा पुतळा दिसतो. पण रोजची सवयीची झालेल्या गोष्टीचं महत्व अचानक लक्षात येतं, तसं झालं आहे. म्हणूनच माझ्या मुलाला मुद्दाम घेऊन आले आहे. You know, she looks stunning on stormy days. वादळादरम्यान या पुतळ्याचं खरं सौंदर्य दिसून येतं. कदाचित न्यूयॉर्कचा आणि आमच्या देशाचा पाया किती मजबूत आहे, हे आता दिसून येईल.”

एका जमान्यात जगभरातले लोक न्यूयॉर्कमध्ये, नव्या जगात नवं आयुष्य उभं करण्याच्या इराद्यानं पाऊल टाकायचे, तेव्हा त्यांना याच पुतळ्याचं दर्शन व्हायचं. “तुमचे थकलेले, गरीबीनं गांजलेले आणि स्वातंत्र्यंच्या शोधात भटकणारे आत्मे मला द्या. मी सोन्याच्या दरवाजाजवळ माझा दिवा उंचावून उभी आहे.”अशा आशयाच्या ओळी या पुतळ्याच्या पायथ्याशी आहेत. पण आजच्या अमेरिकेत निर्वासितांचं असं खुल्या दिलानं स्वागत होईल का हा प्रश्नच आहे.

लिबर्टी बेटापासून जवळच एलिस आयलंड आहे. न्यूयॉर्कमध्ये येणाऱ्या निर्वासितांच्या आणि स्थलांतरीतांच्या बोटी याच बेटावर येत असत. १८९२ ते १९५४ या साठ वर्षांच्या कालावधीत जवळपास सव्वा कोटी निर्वासितांनी या बेटावरून अमेरिकेत प्रवेश केला. आज त्या जागी उभं राहिलंय म्युझियम ऑफ इमिग्रेशन. त्या काळात लोक कसा प्रवास करत असत, त्यांना कुठल्या वैद्यकीय तपासण्यांना आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागायचं, काळासोबत ही प्रक्रिया कशी बदलत गेली, जगभरातील निर्वासित आणि स्थलांतरीत नागरिक आपला देश का सोडतात याविषयीची माहिती इथं मिळते.

registry-room-at-elis-island-compressed

याच संग्रहालयात माझी पॉलशी ओळख झाली. पॉलनं वयाची साठी गाठली आहे. “माझे आजी-आजोबा गेल्या शतकाच्या सुरूवातीला आयर्लंडमधून न्यूयॉर्कला आले होते. काही वर्षांपूर्वी मी इथल्या रजिस्ट्रीमध्ये त्यांची नावंही शोधून काढली. तेव्हापासून, म्हणजे जवळपास २० वर्षांपासून मी दरवर्षी एकदा तरी इथं येतो. आता यावर्षी मुद्दाम माझ्या नातवंडांना घेऊन आलो आहे. They should always remember – America is country of immigrants.” अमेरिका स्थलांतरितांनी उभारलेला देश आहे, हे पुढच्या पिढीला सांगण्याची आता जास्त गरज आहे असं पॉलला वाटतं. ट्रम्प सत्तेत आल्यानं अमेरिकन संस्कृतीचा खुलेपणा हरवत जाईल अशी भीती त्याला वाटतेय.

न्यूयॉर्कर्स असे खुल्या दिलानं आपल्या मनातील भावना व्यक्त करतायत. पण न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका नाही, असं आमच्यासोबतच्या एका शिक्षिकेनं निक्षून सांगितलं. कॅथरिन मूळची साऊथ कॅरोलिनाची. तिनं ट्रम्प यांच्या बाजूनं मतदान केलं होतं. कॅथरिनच्या मनात कशाचा तरी राग, घृणा असल्याचं जाणवलं. मी पर्यटनासाठी आले आहे आणि भारतीय आहे म्हटल्यावर ती जरा निवळली. “अमेरिकेनं आजवर जगाचा विचार केला. जरा स्वतःपुरता विचार केला, तर काय बिघडतं, असा सवाल तिनं केला”. कॅथरिनच्या या प्रश्नावर माझ्याकडे तरी उत्तर नव्हतं.

पॉलनं फक्त तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि खांदे उडवले. “स्वतःपुरता विचार करताना आपण आपल्याच घरात फूट पाडतो आहोत, कधीही कोसळेल सगळं, तेव्हा जरा काळजी घ्या.” पॉलच्या या टिप्पणीवर कॅथरिन चिडून निघून गेली. मला काय बोलावं कळत नव्हतं. पॉलनं मग भारताविषयी बोलण्यास सुरूवात केली. “I love India. मी भारतात काही महिने राहिलो होतो. तुमचा देश मला जास्त सुधारलेला वाटतो. एवढे भेदाभेद असतानाही तुम्ही टिकून आहात. ब्रिटननं तुमच्यावरही अन्याय केला, पण तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली. सगळे लोक एकमेकांसोबत कसे मिळून मिसळून राहता. एवढा मोठा देश म्हटल्यावर भांडणं होणारच. भारतातही असतील, अमेरिकेत तर आहेतच. पण एकमेकांविषयी इतकी घृणा का वाटते आहे लोकांना?” पॉलच्या मनातलं भारताविषयीचं चित्र बदलावंस मला अजिबात वाटलं नाही आणि त्याला पडलेल्या प्रश्नावरही मी काही बोलू शकले नाही.

 

आमची बोट मॅनहॅटनला परतल्यावर मी नाईन इलेव्हन मेमोरियलला भेट दिली. ११ सप्टेंबर २००१ रोजी इथंच वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवर्सवर अल कायदाच्या अतिरेक्यांनी विमानं धडकवली होती. आज त्या दोन टॉवर्सची आठवण म्हणून इथं दोन छोटे चौकोनी तलाव उभारण्यात आले आहेत. तळ्याच्या चारही बाजूंनी सतत पाणी संथपणे झुळझुळत राहतं आणि तळ्याच्या मधोमध असलेल्या खोल भागाकडे वाहात राहतं. चारही बाजूंच्या कठड्यांवर ९/११च्या हल्ल्यात बळी पडलेल्यांची नावं कोरण्यात आली आहेत. एखाद्याचा वाढदिवस असेल तेव्हा तिथं फुलं अर्पण केली जातात. शेजारीच ९/११च्या हल्ल्यातून बचावलेलं एकमेव झाड उभं आहे. वाहत्या पाण्याचा आवाज, मावळत्या सूर्याचा प्रकाश आणि तळ्यांच्या मागे उभा राहिलेला वर्ल्ड ट्रेड सेंटरचा नवा टॉवर अर्थात फ्रीडम टॉवर… उध्वस्त झालेल्या ग्राऊंड झीरोवर आज इतकं सुंदर स्मारक उभं राहिलं आहे.

 

एवढ्या मोठ्या संकटातून अमेरिकेनं स्वतःला सावरलं, पुन्हा टॉवर उभे केले. हा देश इतक्यात मोडणारा नाही. ९/११ नंतर अमेरिका बदलली. जगही बदलत गेलंय. कदाचित येत्या काळात आणखी वेगानं बदल होतील. कदाचित चांगले, कदाचित वाईट. पण त्या प्रत्येकातून सावरण्याची ताकद मानवतेला मिळू दे, अशीच प्रार्थना करावी वाटते.

 

http://abpmajha.abplive.in/blog/americas-freedom-of-expression-after-trump-became-president

बोस्टन. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स राज्याची राजधानी. कोपऱ्या कोपऱ्यावर विद्यापीठं आणि कोपऱ्या कोपऱ्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा मिरवणारं शहर. याच शहरात एक राष्ट्र म्हणून अमेरिकेचा जन्म झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘बोस्टन टी पार्टी’नंच अमेरिकन राज्यक्रांतीची खऱ्या अर्थानं सुरूवात झाली होती. या शहरात इतिहास जणू थिजून राहिला आहे आणि भविष्याचं सावटही घोंगावतंय.

बोस्टनची सैर करायची, तर सर्वात चांगला पर्याय आहे डक टूर. डक म्हणजे DUKW. अर्थात पाण्यात आणि जमिनीवर चालणारी Amphibian वाहनं. दुसऱ्या महायुद्धात सैनिकांची आणि सामनाची ने-आण करण्यासाठी या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला होता. १९९४ पासून असे काही डक्स पर्यटकांना शहराचा सैर-सपाटा घडवून आणण्यासाठी वापरले जातायत. आणि डक चालवणारे ड्रायव्हर्स-कम-टूरिस्ट गाईड्सही मोठे मजेशीर आहेत. आमच्या गाईडच नाव होतं ‘फ्रिम जॉली’.

janhavee-moole-blog-boston
आपल्या खास शैलीत फ्रिमनं आम्हाला बोस्टनमधल्या ऐतिहासिक जागांविषयी, इमारतींविषयी माहिती दिलीच, पण आसपासच्या घटनांविषयी त्याची मतंही मजेदार होती. युरोपातून इथं स्थलांतर केलेल्या लोकांनी – इमिग्रंट्सनी कशी बोस्टनची उभारणी केली हे सांगताना इमिग्रंट्स या शब्दावर त्यानं दिलेला जोर, लक्षात राहिला आहे अजूनही. एकीकडे ट्रम्प समर्थकांची इमिग्रंट्सना देशातून बाहेर काढण्याची भाषा आणि दुसरीकडे आपला देशच इमिग्रंट्सनी बनलाय हे सांगणारा फ्रिम. विशेष म्हणजे फ्रिमनं इमिग्रंट्सचा उल्लेख केल्यावर डकमधले अनेक अमेरिकन्सही स्मितहास्य करत होते.

janhavee-moole-blog-boston-4
तसं इथले सामान्य नागरीक अनोळखी लोकांसमोर सहसा आपलं राजकीय मत थेटपणे मांडत नाहीत. पण कधी कधी जाता जाता एखादं वाक्य बोलतात, ज्यामुळं त्यांच्या मनात खदखद सुरू असल्याची जाणीव होते. फ्रिमला आणि आमच्या सहप्रवाशांना पाहून तेच जाणवतं.

बोस्टनच्या रस्त्यांवरून फिरताना मध्येच आमचं डक चार्ल्स नदीत शिरलं आणि ट्रकची लगेच बोट बनली. अमेरिकेतली सर्वात स्वच्छ शहरी नदी म्हणून चार्ल्स नदीची ओळख आहे. याच नदीकाठावर अडीचशे वर्षांपूर्वी असंतोषाची ठिणगी पडली होती आणि त्यातूनच अमेरिका हे राष्ट्र जन्माला आलं, हे सांगताना फ्रिमच्या डोळ्यांत आणि आवाजात अभिमान दाटला होता.

janhavee-moole-blog-boston-2

अभिमान वाटावा, अशा अनेक गोष्टी बोस्टनवासियांकडे आहेत. विद्यापीठं असोत, शतकांपूर्वीच्या इमारती असोत वा तिथं घडलेल्या घटना. बोस्टननं आपला वारसा जपून ठेवला आहे. ‘बोस्टन टी पार्टी’चाही त्याला अपवाद नाही.

बोस्टनच्या आणि अमेरिकेच्याच नाही, तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे बोस्टन टी पार्टी. 1773 साली ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीला * कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतींमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती. पण वसाहतींमधल्या व्यापारावर ब्रिटनचं असं नियंत्रण अमेरिकन राष्ट्रवाद्यांना – पॅट्रियट्सनी मान्य नव्हतं. त्याचा निषेध करण्यासाठी १६ डिसेंबरच्या संध्याकाळी सॅम्युएल अॅडम्सच्या नेतृत्त्वाखाली क्रांतीकारक एकत्र जमले. पण बैठकीनंतर जमावानं बोस्टनच्या बंदरात घुसून तीन्ही जहाजांवरचा जवळपास तीनशे टन चहा समुद्रात फेकून दिला. या घटनेनं अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याला वेग मिळाला होता.

बोस्टनच्या बंदरात ज्या परिसरात ही घटना घडली, तिथं आता बोस्टन टी पार्टी म्युझियम उभारण्यात आलं आहे. १६ डिसेंबर १७७३च्या त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम इथं दररोज पुन्हा उभा केला जातो आणि संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना त्या बोस्टन टी पार्टीत सहभागी होण्याचीही संधी मिळते. एकूण काय, तर तुम्ही थेट १७७३मध्ये जाऊन पोहोचता.

janhavee-moole-blog-boston-5

संग्रहालयात प्रवेश करताच बोस्टन टी पार्टीची नायिका ‘सारा ब्रॅडली’नं आमचं स्वागत केलं आणि मी भारतातून आले आहे म्हटल्यावर ‘ईस्ट इंडिया कंपनी तिथेही त्रास देते आहे लोकांना’ अशी टिप्पणीही केली. सॅम्युएल अॅडम्सचं भाषण ऐकल्यावर, जहाजांवर आक्रमण केल्यावर आणि चहाचे खोके समुद्रात बुडवल्यावर आम्ही एका दालनात पोहोचलो. तिथं किंग जॉर्ज आणि सॅम्युएल अॅडम्सच्या बोलक्या पोर्ट्रेट्सनी आणि होलोग्राफ्सनी पुढचा घटनाक्रम उभा केला. मॅसॅच्युसेट्सच्या नागरिकांनी अमेरिकन क्रांतीमध्ये कसं योगदान दिलं होतं ते दाखवणारी फिल्मही पाहिली.

टूर संपल्यावर साराशी बातचीत करण्याची संधी मिळाली. (तिचं खरं नावही साराच आहे.) रोज इतिहास जगणाऱ्या व्यक्तींना आजच्या अमेरिकेविषयी, ट्रम्पच्या अमेरिकेविषयी काय वाटतं, याविषयी मला उत्सुकता वाटत होती.

janhavee-moole-blog-boston-6
साराला इतिहास जास्त आवडतो. लोकांनी इतिहासाविषयी जाणून घ्यायला हवं असं तिचं मत आहे. ‘तुम्ही कुणीही असाल, कुठल्याही देशाचे असाल, तुमची राजकीय किंवा वैचारिक भूमिका काहीही असेल, तरी इतिहासाची जाणीव ठेवायला हवी. लोकांमध्ये मतभेद आहेत. असायलाच हवेत. पण आपण आपली ही वेगवेगळी मतं का मांडू शकतो, याचं उत्तर इतिहासात आहे. इतिहास आपल्याला आपल्या गौरवशाली पार्श्वभूमीची आठवण करून देतो, तसंच चुकांची जाणीवही करून देतो.’

साराला विचारलं, आज तू सारा ब्रॅडलीची भूमिका साकारते आहेस, पण अजून २०० वर्षांनी लोक अशी आजच्या नेत्यांची भूमिका साकारतील का? सारा खळखळून हसली आणि म्हणाली, ‘काळच सांगेल काय ते, आत्ता विचारही करवत नाही.’

बोस्टन टी पार्टीच्या दिवशी तीन जहाजांमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचा चहा भरला होता, त्या प्रकारच्या चहांची चव चाखण्यासाठी म्युझियममध्ये खास टी रूम आहे. तिथं चहापान करताना एक इटालियन जोडपं भेटलं आणि आम्हा तिघांची चाय पे चर्चा सुरू झाली. मार्को आणि रोझा नेपल्सचे रहिवासी आहेत आणि सध्या बोस्टनमध्ये शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आले आहेत. ‘मुलानं अमेरिकेत शिकण्याचा निर्णय घेतला खरा, पण आता इथं सगळ्याच परदेशी विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळणं जड जाईल अशी भीती वाटते आहे. आधीच ब्रेक्झिट, त्यात इटलीतही युरोपपासून वेगळं होण्याची मागणी सुरू आहे, आता अमेरिकेत काय होईल काही सांगता येत नाही.’ कुठल्याही भीतीपेक्षा किंवा असुरक्षिततेच्या भावनेपेक्षा ही अनिश्चितता अनेकांना जास्त त्रास देते आहे.

janhavee-moole-blog-boston-3

टी पार्टी म्युझियमजवळच बंदरावर बोटींसाठीचा धक्का – अॅटलांटिक व्हार्फ आहे. तिथं खाडीच्या किनाऱ्यावर बेंचेस टाकले आहेत. दुपारच्या वेळेस बोस्टनियन्स तिथं ऊन खात बसतात. या बेंचेसजवळच बोस्टन बंदराची माहिती देणारे फलक आहेत. 1919 साली बोस्टनमध्ये डिस्टिलरीतील स्फोटात टँक फुटल्यानं काकवीचा पूर आला होता. त्याआधी 1872 आणि 1760 साली मोठ्या आगींमध्ये बंदर भस्मसात झालं होतं. मार्को आणि रोझासोबत मीही ती माहिती वाचत होते.

आमच्यासोबत म्युझियमची सफर करणारा आणि एवढा वेळ आमची चर्चा ऐकणारा एक अमेरिकन पर्यटक न राहावून म्हणाला, “Boston has rebuilt itself again and again. It has endured the Great Fires. America will endure it too”, अमेरिका यातूनही बाहेर पडेल.

–    जान्हवी मुळे

 

*तीच ईस्ट इंडिया कंपनी जिनं भारतावरही राज्य केलं.

 

http://abpmajha.abplive.in/blog/janhavee-moole-blog-from-boston

२५ जानेवारी २०१५. आंदोलनाला हिंसक वळण लागून सोळा जणांचा मृत्यू

२९ जानेवारी – सायनाईमध्ये अतिरेकी हल्ल्यात २० जण मृत्यूमुखी

३ फेब्रुवारी – अलेक्झांड्रियात बॉम्बस्फोट, कैरो शहरात आणि विमानतळावर स्फोटकं हस्तगत

गेल्या काही दिवसांतल्या या घडामोडींनी मन विचलीत केलंय. मनात चुकचुकणारी शंकेची पाल समोर प्रत्यक्षात अवतरल्यासारखं वाटतंय. इजिप्तमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा दिसून आलं.

20150102_132030

Downtown Cairo

खरं तर इजिप्तला जाणं किती सुरक्षित आहे असा प्रश्न अनेकांनी विचारून झाला आहे. आज त्याचंच उत्तर देणार आहे. It may not be completely safe, but it’s definitely worth taking the risk.  तिथल्या वास्तव्यात मला हेच वारंवार जाणवलं होतं, आणि आजही मला तेच म्हणावंसं वाटतं. कदाचित मी तिथल्या सुरक्षिततेची खात्री देऊ शकणार नाही, पण इजिप्तभेटीचा धोका पत्करायला हरकत नाही, असंच मला वाटतं.

इजिप्त हे एक वेगळंच रसायन आहे. २०११ साली अरब स्प्रिंगनंतर इजिप्तमध्ये सत्तांतर झालं. मैदान तहरीर (तहरीर चौक) मधील आंदोलनानं जगाचं लक्ष वेधून घेतलं. २५ जानेवारी २०११ रोजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारकनी राजीनामा दिला. पुढच्या चार वर्षांत इजिप्तमध्ये दोन राष्ट्राध्यक्ष (मोहम्मद मोरसी आणि अब्देल फताह अल सिसी) आणि सहा पंतप्रधान झाले पण लोकशाहीनं अजूनही खऱ्या अर्थानं मूळ धरलेलं नाही.

पण चार वर्षांतील उलथापालथींचा तिथल्या समाजजीवनावर मात्र खोलवर परिणाम झालेला आहे. कैरो एयरपोर्टवर उतरल्यावरच त्याची पहिली झलक पाहायला मिळाली. टूरिस्ट सीझन असूनही एयरपोर्टवर तुरळक माणसंच दिसत होती. पिरॅमिड्स, म्युझियम आणि इतर ठिकाणीही तसंच चित्र. तुलनेनं लुक्सॉर आणि अलेक्झांड्रियाला पर्यटकांची गर्दी दिसली. मात्र नेहमीपेक्षा यंदा पर्यटकांची संख्या रोडावल्याचं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं. इजिप्तसारख्या देशात जिथे पर्यटन व्यवसाय हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे, अशा अर्थव्यवस्थेवर त्यामुळे मोठा ताण पडला आहे. टूरिस्ट गाईड्स, टूर ऑपरेटर्सपासून ते टॅक्सी ड्रायव्हर्स, हॉटेल व्यवसायिक, आणि अगदी सामान्य फेरीवाले अशा सगळ्यांनाच त्याची झळ पोहोचली आहे.

Graffiti in Tehrir Square

Graffiti in Tehrir Square

 

तिथे पदोपदी जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पोलीसांचा प्रभाव. लौकिकार्थानं इजिप्त पोलीस स्टेट नसलं तरी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठीकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस, सशस्त्र सुरक्षारक्षक आणि सैनिकांचा वावर दिसून येतो. अनेकदा पोलिसच अतिरेकी हल्यांचं टारगेट बनतात. आमच्या तिथल्या वास्तव्यात रोज अशा हल्ल्याची काही ना काही बातमी यायचीच.

२७ डिसेंबरला आम्ही मैदान तहरीर आणि इजिप्शियन म्युझियमला भेट दिली. तहरीर चौक म्हणजे चहुबाजूंनी इमारतींनी वेढलेली शहरातली एक रिकामी जागा, चारी बाजूंनी शहराच्या वेगवेगळ्या भागांकडे जाणारे रस्ते आणि सतत वाहणारं ट्रॅफिक. पण याच रिकाम्या जागेत भरलेल्या आंदोलनानं सगळं जग भारावून गेलं होतं. २०११ मध्ये होस्नी मुबारक यांच्या विरोधात आणि २०१३ साली मोहम्मद मोरसी यांच्याविरोधात तहरीरमध्ये मोठे उठाव झाले. सध्या तहरीरमध्ये एकप्रकारची जमावबंदी आहे. थेट कर्फ्यू नसला तरी लोकांना मोठ्या गटानं एकत्र उभंही राहू दिलं जात नाही. अपवाद अर्थात पर्यटकांचा. बाकी ठिकठिकाणी पोलीस, ट्रॅफिक पोलीस जणू पाळत ठेवून असतात. २५ जानेवारीला, आंदोलनाच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या दिवशी तर तहरीर बंदच ठेवण्यात आलं होतं. आज त्यामुळेच आंदोलनाचं केंद्र शहरातल्या इतर भागांत जिथे मुस्लीम ब्रदरहूडचं वर्चस्व आहे अशा ठिकाणी सरकलं आहे.

Egyptian Museum

Egyptian Museum, Tehrir Square, Cairo

 

याच चौकात एका बाजूला आहे इजिप्शियन म्युझियम. इजिप्तचा ऐतिहासिक ठेवा जपणारं संग्रहालय. युवा फारो तुतनखामूनचा मुखवटा, त्याच्या मकबऱ्यातून सापडलेला खजिना, प्राचीन आणि रोमन काळातील इजिप्तच्या रोजच्या जगण्यातील अनेक वस्तू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ममीज. म्युझियममध्ये एका खास दालनात रामसेस, हाटशेसूट, सेटी आणि इतर प्रसिद्ध फारोजच्या ममीज ठेवण्यात आल्या आहेत. संग्रहालयाच्या वेगवेगळ्या दालनांत शिरताच आपण वेगळ्याच विश्वात, इतिहासात खूप मागे गेल्यासारखं भासतं.

२०११मध्ये या संग्रहालयाला क्रांतीचे चटके सहन करावे लागले. तहरीरमध्ये त्यावेळी प्रचंड अनागोंदी माजली, त्याचा फायदा घेत काहींनी वेस ओलांडून म्युझियममध्ये प्रवेश केला. त्या दंगलीत संग्रहालयात बरीच नासधूस आणि लुटालूट झाली. सुदैवानं बहुतेक सर्व वस्तू परत मिळवण्यात आल्या. सध्या संग्रहालयात अनेक वस्तूंचं रिस्टोरेशन सुरू आहे. त्यामुळेच ‘हा मुखवटा २०११च्या क्रांतीच्या वेळेस तुटला होता’, ‘सदर मूर्तीचे २०११च्या क्रांतीच्या वेळेस दोन तुकडे झाले होते, एक मैदानातील लॉनवर सापडला, नंतर ही मूर्ती दुरुस्त करण्यात आली’ अशा नोंदी सापडतात. आणि मग प्रश्न पडतो. क्रांतीनं इजिप्तला खरंच काय दिलं? फायदा नेमका कुणाचा झाला? का आज हा देशच रिस्टोरेशनच्या अवस्थेत पोहोचला आहे?

मुबारक यांच्यानंतर मुस्लीम ब्रदरहूडचे नेते मोहम्मद मोरसी ३० जून २०१२ रोजी सत्तेत आले. मात्र कट्टरतेकडे झुकणाऱ्या त्यांच्या राजवटीविरुद्ध पुन्हा आंदोलन झालं आणि वर्षभरानं मोरसींना सत्ता गमवावी लागली. मात्र आजही मुस्लीम ब्रदरहूड आणि मोरसींच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. इजिप्त हा देश ब्रदरहूड समर्थक आणि ब्रदरहूडच्या विरोधकांमध्ये विभागला गेला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यातही ब्रदरहूड विरोधकांमध्ये कुणी सिसींचे समर्थक आणि कुणी विरोधक आहेत. सामान्य इजिप्शियन लोक मात्र स्वतःला या राजकारणाच्या थेट चर्चेपासून दूर ठेवताना दिसतात. पण त्यांच्या राजकीय जाणीवा तीव्र असल्याचं प्रकर्षानं जाणवतं.

The future of Egypt: Our little friends in Luxor, Their smiles are precious...

The future of Egypt: Our little friends in Luxor, Their smiles are precious…

 

एक मात्र खरं वेगवेगळ्या विचारसरणींचे असूनही सर्वांना इजिप्शियन असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो. राष्ट्रीयत्वाची ही भावना इजिप्तच्या इस्लामिक आणि अरब या दोन ओळखींपेक्षा मोठी आहे. आणि म्हणूनच इजिप्तकडून आशाही मोठ्या आहेत. एरवीही क्रांतीचं रान पेटल्यावर शांत होण्यासाठी बराच काळ जावा लागतो. फ्रेन्च आणि रशियन राज्यक्रांतीनंतरही लगेच स्थैर्य आलं नव्हतं. इजिप्तलाही थोडा वेळ द्यायला हवा.

या देशानं खूप काही उपभोगलं आहे, भोगलं आहे आणि सोसलंही आहे. आज तिथे अस्थिरता नसली, तरी एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहते. भविष्याविषयी अनिश्चितता जरूर आहे, पण तिचं सावट रोजच्या जगण्यावर पडलेलं नाही. हाच आशेचा मोठा कीरण आहे.

IMG_20141226_192203

Corner view of The Great Pyramid, Giza

इजिप्तहून परतले, त्याला आता आठवडा उलटलाय. पण मन अजूनही तिथेच रेंगाळते आहे. तो देश आहेच तसा. पटकन आपलंसं करणारा, मनावर गारूड करणारा, प्रसंगी अचंबित करणारा, विचार करायला लावणारा, कधी थोडं घाबरवणारा आणि कधी नवी उमेद देणारा..

 

इजिप्तमध्ये पाऊल ठेवताच काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. दिशा, भाषा सगळंच काही वेगळं. राईट हँड ड्रायव्हिंग असो, किंवा उजवीकडून लिहिली जाणारी अरबी, उत्तरेला समुद्र आणि दक्षिणेला पर्वत हे भारतापेक्षा अगदी उलटं गणित.. अप्पर इजिप्त दक्षिणेला आणि लोअर इजिप्त उत्तरेला, नाईल दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते, असे संदर्भ लक्षात ठेवावे लागतात. एरवी किती सहजेतनं आपण या दिशा गृहित धरून चालतो!

 

IMG_20150102_200246

A relaxed Afternoon, Khan al Khalili Market Cairo

पण असे काही फरक सोडले, तर इजिप्त आणि भारतामध्ये खूप साम्य दिसून येतं. दोन्ही देशांना प्राचीन इतिहासचा संपन्न वारसा लाभला आहे. महान नद्यांच्या काठावर पोसले गेलेले हे देश.. दोन्ही देशांत प्राचीन काळापासून व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत आलीय. दोन्ही देशांवर एकेकाळी ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. दोन्ही देशांतील नागरिकांना आपल्या संस्कृतीचा प्रचंड अभिमान आहे. शीतयुद्धाच्या काळात अलिप्त राष्ट्र गटाच्या माध्यमातून भारत आणि इजिप्तनं जगात शांतता टिकवून ठेवण्यास हातभार लावला होता. दोन्ही देश प्रादेशिक महासत्ता आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

गेल्या काही वर्षांत इजिप्त जागतिक राजकाऱणात एक महत्त्वाचं केंद्र बनलंय. कैरोच्या मैदान तहरीर मध्ये झालेला उठाव असो, किंवा इस्राएल आणि पॅलेस्टाईनमधल्या वाटाघाटी, इजिप्त नेहमीच चर्चेत राहिलंय. बहुसंख्य मुस्लिम असणारं अरब राष्ट्र असूनही इजिप्त अनेक बाबतींत वेगळं ठरतं.  इथल्या लोकांना आपण इजिप्शियन असल्याचा अभिमान आहे, जो पदोपदी जाणवत राहतो.

IMG_20141226_185619

Suez Canal connecting the Mediterranean and Red Sea

 

फारोंच्या काळातलं प्राचीन इजिप्त, ज्याचे केवळ भग्नावशेष आज पाहायला मिळतात. ग्रीक, रोमन ऑटोमन काळातलं इजिप्त, ज्याचा ठसा आजच्या इजिप्तवरही दिसून येतो. डाऊनटाऊन कैरोवर पॅरिसची छाप जाणवते, तर अलेक्झांड्रिया युरोपमध्येच असल्यासारखं वाटतं. सुएझ कालवा होण्याच्या आधीपासूनच इजिप्त पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं एक महत्त्वाचं केंद्र आहे. कदाचित म्हणूनच तिथे अनेक विरोधाभास पाहायला मिळतात.  इजिप्तची खाद्यसंस्कृतीही अशीच, रंगीबेरंगी आहे.

इजिप्त म्हणजे मस्त जमून आलेली भेळ आहे. जगातलं सगळं काही थोडं थोडं, एकत्र येऊन तयार झालेली.  पण इतिहास आणि राजकारणाच्या पलिकडे जायचं, तर इजिप्तच्या माणसांनी, त्यांच्या आदरातिथ्यानं मला अगदी आपलंसं केलं.

 

इजिप्तच्या सफरीत खूप काही अनुभवायला मिळालं. सगळंच शब्दांत मांडायचं तर थोडा वेळ आणि थोडी जागा लागेल. म्हणूनच जसं जमेल तसं लिहून शेअर करायचं ठरवलंय.

– जान्हवी मुळे.

कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध किंवा सत्तेसमोर उभं राहणं सोपं नसतं. पण इराणच्या शिरीन एबादी यांनी ती हिंमत दाखवली म्हणूनच इराणमध्ये अनेकांच्या आयुष्यात, खास करून स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडून आला..

56-212027-3634016280-cf3c010b99-bतेहरानमधल्या घरात लहान भावंडांसह बागडणारी छोटी मुलगी ते नोबेल पारितोषिक जिंकणारी मुस्लीम देशांतील पहिली महिला असा शिरीन एबादी यांचा प्रवास.

एबादी यांचा जन्म १९४७ साली एका संपन्न कुटुंबात झाला, जिथे मुलं आणि मुलींना समान वागणूक दिली जायची. अन्याय सहन करणं त्यांच्या रक्तातच नव्हतं. म्हणूनच त्यांनी न्यायाधीश व्हायचं ठरवलं. कायद्याचा अभ्यास करत असतानाच इराणच्या शाहविरुद्ध आंदोलनातही त्या उतरल्या होत्या. वयाच्या २२व्या वर्षी कायद्याची पदवी मिळवल्यावर त्यांची कनिष्ठ कोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूकही झाली.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, इराण मुस्लिम राष्ट्र असलं तरी अरब राष्ट्र नाही. तिथे स्त्रियांना इतर मुस्लिम राष्ट्रांपेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. मात्र त्यांना आजही पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान आहे. १९७९ साली इराणमध्ये इस्लामी क्रांतीनंतर ही गोष्ट प्रकर्षानं जाणवू लागली. शिरीन एबादींसह सर्व महिला न्यायाधीषांना आपलं पद सोडावं लागलं.

 एबादींना सल्लागार म्हणून बदली नोकरी मिळाली पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. १९८४ साली त्यांनी निवृत्ती घेतली.  खूप प्रयत्नांनंतर १९९२ साली एबादी यांनी वकिली कारकीर्द सुरू केली.

इतर वकिल ज्यावर बोलण्यासही धजावायचे नाहीत, असे संवेदनशील खटले एबादी यांनी लढवले. मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य आणि इस्लामशी निगडीत अनेक प्रश्न एबादी यांनी न्यायालयात उपस्थित केले आणि सत्ताधीषांना आव्हान दिलं. एबादी महिलांच्या अधिकाऱांसाठी लढणाऱ्यांचा आवाज बनल्या.. अत्याचार सोसणाऱ्यांची बाजू एबादी यांनी मांडली तीही इस्लामच्या चौकटीत राहूनच. एबादी अनेकदा कुराणमधल्या घटनांचे दाखले अशातऱ्हेने देत की कट्टरपंथी न्यायाधीशही गोंधळून जात. देशविदेशांतून शिरीनना भाषणासाठी आमंत्रणं येऊ लागली. एबादी यांनी पुस्तकांतूनही अनेक प्रश्नांना वाचा फोडली.

२००० साली शिरीनना  तुरुंगात टाकण्यात आलं. कबुलीजबाब घेण्यासाठी आपला अतोनात छळ करण्यात आला, असं एबादींनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय. एबादींना लोकांचा पाठिंबा पाहता सरकारनं अखेर त्यांची जामिनावर सुटका केली.

२००३ साली एबादी यांना नोबेल पारितोषिक जाहीर झालं. पुरस्कार स्वीकारून एबादी घरी परतल्या तेव्हा विमानतळावर हजारो लोक,  सहकारी, पुरोगामी नेते, अधिकारी आणि अयातोल्ला खोमेनींची मुलगीही आली होती.

२००९ साली इराणच्या वादग्रस्त निवडणुकींनंतर राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद यांच्याविरोधात जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. एबादी यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांच्या जीवाला आधीपासून धोका होताच, पण परिस्थिती चिघळत गेली. २००९ सालापासून एबादी इंग्लंडमध्येच वास्तव्याला आहेत. इराणमध्ये परतणं त्यांच्यासाठी सध्या अशक्य आहे. पण देशाबाहेर पडल्यावरही त्यांचं काम थांबलेलं नाही.

– जान्हवी मुळे

खेळाच्या मैदानातील काही महत्त्वाच्या घडामोडी…

हॉकीत महिला पुरुषांपेक्षा वरचढ

2013 साली हॉकीच्या मैदानात एकीकडे भारतीय महिलांनी इतिहास रचला, तर दुसरीकडे पुरुष संघानं मात्र निराशा केली..

जर्मनीत झालेल्या ज्युनियर महिला विश्वचषकात भारताच्या मुलींनी कांस्यपदकाची कमाई केली. सुशीला चानूच्या टीमनं मिळवलेलं पदक हे कोणत्याही हॉकी विश्वचषकात भारतीय महिलांचं पहिलंच पदक ठरलं. भारताच्या सीनियर महिला टीमनंही आशिया चषकात कांस्य आणि एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्यपदक मिळवलं.

देशांतर्गत हॉकीत आयपीएलच्या धर्तीवर हॉकी इंडिया लीगच्या निर्मितीनं भारतातील हॉकीपटूंना नवी संधी मिळवून दिली. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुषांच्या ज्युनियर आणि सीनियर संघांनी निराशाचकेली. आशिया चषकातलं रौप्य वगळता पुरुष संघाला अपयशच आलं. अर्थात ऑस्ट्रेलियानं ओशियानिया कप जिंकल्यानं भारतीय पुरुष संघाला 2014 सालच्या विश्वचषकात मागच्या दरवाज्यानं प्रवेश मिळाला आहे.

——————

बुद्धिबळाच्या पटावर सत्तापालट

बुद्धिबळाच्या सिंहासनावरून विश्वनाथन आनंदला यंदा पायउतार व्हावं लागलं.

चेन्नईत झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आनंदला नॉर्वेच्या वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसननं पराभूत केलं. पाच वेळचा विश्वविजेता आनंद कार्लसनविरुद्ध एकही डाव जिंकू शकला नाही. वर्षभरात इतर स्पर्धांमध्येही आनंदला संमिश्र यश मिळालं. अर्थात आनंदनंनिवृत्तीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत आणि नव्या वर्षात चांगली कामगिरी बजावण्याचा निर्धार केला आहे.

दुसरीकडे युवा पिढीनंही भारताच्या आशा जागवल्या. परिमार्जन नेगी, अभिजित गुप्ता, नारायणन श्रीनाथ यांनी उल्लेखनीय विजय नोंदवले. महिलांमध्ये सौम्या स्वामिनाथननं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचं रौप्यपदक मिळवलं. तर ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येनाशिकच्या विदित गुजराथीनं कांस्य पदकाची कमाई केली.

——

बॅडमिंटनमध्ये नवी आशा

भारतीय बॅडमिंटनची नायिका सायना नेहवालच्या कामगिरीला 2013मध्ये ग्रहण लागलं.  सायनाला वर्षभर दुखापतींनी सतावलं आणि तिची जेतेपदांची झोळी रिकामीच राहिली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सायना उपांत्यपूर्व फेरीतच पराभूत झाली. रँकिंगमध्येहीसायनाची आठव्या स्थानावर घसरण झाली.

दुसरीकडे भारताच्या पी.व्ही. सिंधूनं मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी बजावली. ग्वांग्झूमध्ये झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूनं महिला एकेरीचं कांस्यपदक मिळवलं आणि अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली. त्याशिवायमलेशिया आणि मकाऊमध्ये झालेल्या ग्रांप्री गोल्ड स्पर्धांमध्येही सिंधूनं सुवर्णपदकं मिळवली. अर्थात इंडियन बॅडमिंटन लीगच्या मंचावर सायना आणि सिंधूमध्ये झालेल्या समोरा-समोरच्या लढाईत सायनानंच बाजी मारली.

आता पुढील मोसमात फिटनेसवर जास्त भर देण्याचा निर्धार सायनानं केला आहे. तर सिंधूसमोर आपला फॉर्म कायम राखण्याचं आव्हान आहे. 2014 साली भारतीय बॅडमिंटनच्या या दोन्ही नायिकांकडून कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्ये पदकांची अपेक्षा आहे..

एरवी भारतात बॅडमिंटनसाठी 2013चं वर्ष संमिश्र ठरलं. इंडियन बॅडमिंटन लीगच्या रुपानं या खेळाला नवी संजीवनी मिळाली. ऑगस्टमध्ये झालेल्या आयबीएलमध्ये सायना नेहवालच्या हैदराबाद हॉटशॉट्सनी जेतेपद मिळवलं. सायना आणि सिंधूमधल्या सामन्यानंस्पर्धेची चुरस वाढली. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष एकेरीत भारताच्या परुपल्ली कश्यपनं टॉप टेनमध्ये धडक मारली. के श्रीकांतनं थायलंड ओपनमध्ये तर त्याचा भाऊ नंदगोपालनं मालदिवमध्ये पदकं मिळवली. महाराष्ट्राच्या अक्षय देवलकर, प्राजक्ता सावंत आणिप्रज्ञा गद्रेनं आश्वासक कामगिरी बजावली.

गेल्या मोसमात कोर्टबाहेर मात्र वादविवादांनी उचल खाल्ली. आयबीएलच्या लिलावात कमी बोली लागल्यानं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा नाराज झाल्या. आयबीएलदरम्यान वर्तणुकीसाठी ज्वालावर शिस्तभंगाच्या आरोपाखाली बंदी घालण्यात आली, मात्र दिल्लीउच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेनं बंदीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान ज्वाला आणि अश्विनी पुन्हा एकत्र आल्यानं, महिला दुहेरीत पुढील वर्षी पदकाच्या आशा उंचावल्या.

टेनिसकोर्टवर पेस, सानिया, सोमदेवचा ठसा

टेनिस कोर्टवर 2013 साली भारताचे स्टार ठरले, लिअँडर पेस आणि सानिया मिर्झा..

पेसनं वयाच्या चाळिशीत ग्रँड स्लॅम विजय मिळवणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.. 2013 सालच्या अमेरिकन ओपनमध्ये पुरुष दुहेरीत पेसनं चेक रिपब्लिकच्या राडेक स्टेपानेकच्या साथीनं जेतेपद मिळवलं. पुरुष दुहेरीत ही जोडी रँकिंगमध्ये सध्यासातव्या स्थानावर आहे.

सानिया मिर्झानं या मोसमात केवळ दुहेरीवरच लक्ष केंद्रीत केलं. डब्ल्यूटीए स्पर्धांमध्ये महिला दुहेरीत सानियानं वेगवेगळ्या साथीदारांसह पाच जेतेपदं मिळवली आणि टॉप टेनमध्ये जागा बनवली. वर्षअखेरीस सानियानं नववं स्थान गाठलं. पुढील मोसमात काराब्लॅकच्या साथीनं महिला दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपदासाठी सानिया सर्वात मोठी दावेदार बनली आहे.

पुरुष एकेरीत सोमदेव देववर्मननंही खराब फॉर्म मागे टाकला आहे. वर्षाच्या सुरूवातीला सोमदेवचं रँकिंग सहाशेहूनही खाली होतं. मात्र वर्षअखेरीस त्यानं टॉप हंड्रेडमध्ये झेप घेतली आहे. त्याशिवाय रोहन बोपण्णा नवीन मोसमात पुरुष दुहेरीत पुन्हा एकदा पाकिस्तानच्याऐसाम उल हक कुरेशीच्या साथीनं खेळणार आहे. या इंडो-पाक जोडीकडून नव्या मोसमात चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

कोर्टबाहेर 2013चं वर्ष भारतीय टेनिससाठी उलथापलथींचं ठरलं. वर्षाच्या सुरूवातीलाच सोमदेव देववर्मनच्या नेतृत्त्वाखाली अकरा टॉप खेळाडूंनी ऑल इंडिया टेनिस असोसिएशनविरुद्ध बंड पुकारलं. आयटाला नमतं घेत खेळाडूंच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.खेळाडूंनी एकत्र येऊन भारतीय टेनिस प्लेयर्स असोसिएशनची स्थापना केल्यानं खेळाडूंच्या प्रश्नांना वाचा फुटली. भारताचा दिग्गज टेनिसपटू महेश भूपतीच्या पुढाकारानं होऊ घातलेली इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग हे नव्या मोसमात भारतीय चाहत्यांसाठी मोठंआकर्षण ठरेल. जगभरातले दिग्गज टेनिसपटू या स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.

तिरंदाजीच्या गोल्डन गर्ल्स

भारतीय तिरंदाजांसाठी 2013चं वर्ष गोल्डन इयर ठरलं. दीपिका कुमारी, बोम्बायला देवी आणि रिमिल ब्रुईलीच्या भारतीय संघानं 2013 साली दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली. ऑगस्ट महिन्यात पोलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात तर भारतीयमहिलांनी ऑलिम्पिक चॅम्पियन कोरियावर सनसनाटी विजय मिळवला. स्वतः दीपिकानं वर्षभरात सात आंतरराष्ट्रीय पदकं मिळवली.

पुरुष संघाला रिकर्व्ह तिरंदाजीत एकही पदक मिळवता आलं नाही. मात्र आशियाई स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं पहिल्यांदाच कम्पाऊंड तिरंदाजीत सांघिक सुवर्णपदक मिळवलं.  2014 साली होणाऱे कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्स पाहता भारतीय तिरंदाजांचा फॉर्मउत्साह वाढवणारा आहे.

—-

भारतीय ऑलिम्पिक संघटनेत सुधारणा

खेळाडू, चाहते, क्रीडा मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडून वाढत्या दबावासमोर भारतीय ऑलिम्पिक संघटना म्हणजे आयओएला अखेर नमतं घ्यावं लागलं.

आयओसीच्या इशाऱ्यानंतर आयओएनं आपल्या घटनेत आवश्यक बदल केले होते. त्यानुसार आता आरोपपत्र दाखल झालेल्या व्यक्तींना आयओएच्या निवडणुकांपासून दूरच ठेवलं जाईल. येत्या नऊ फेब्रुवारीला आयओएनं निवडणुका घेण्याचं निश्चित केलं. आयओएनंलवकरात लवकर निवडणुका घेतल्या तर भारताचा ऑलिम्पिकमध्ये परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

—-

अॅथलेटिक्सला डोपिंगचा डाग

2013 साली पुण्यात आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. भारतानं या स्पर्धेत 17 पदकांसह सहावं स्थान मिळवलं.  भारतासाठी थाळीफेकीत विकास गौडानं आणि महिलांच्या 4 बाय 400 मीटर रिले संघानं सुवर्णपदक मिळवलं. मात्र इतर मोठ्यास्पर्धांमध्ये भारतीय अॅथलीट्सकडून निराशाच झाली. त्यात नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं केलेल्या तपासणीत राष्ट्रीय स्तरावरील 23 अॅथलीट्स दोषी आढळल्यानं भारताची पुन्हा नाचक्की झाली. मात्र ज्युनियर स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या युवाखेळाडूंची कामगिरी आश्वासक ठरली..

नेमबाजीत अचूक लक्ष्यवेध

2013 साली भारताच्या हीना सिद्धू, लज्जा गोस्वामी आणि राही सरनोबतनं अचूक लक्ष्यवेध साधला.

24 वर्षीय हीनानं नोव्हेंबर महिन्यात म्युनिकमध्ये झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये 10 मीटर एयर पिस्टलचं सुवर्णपदक मिळवलं. वर्ल्ड कप फायनलमध्ये सुवर्णपदक मिळवणारी हीना भारताची पहिलीच पिस्टल नेमबाज ठरली.

राही सरनोबतनं कोरियात झालेल्या विश्वचषकात स्पोर्टस पिस्टलचं सुवर्णपदक मिळवलं.

तर ग्रॅनडामध्ये झालेल्या विश्वचषखात लज्जा गोस्वामीनं नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात रौप्यपदक मिळवलं.

भारताचा अव्वल ट्रॅप शूटर आणि माजी विश्वचषक विजेता रंजन सोढीला 2013 साली खेल रत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं…

———

कुस्तीच्या आखाड्यात युवा पैलवानांची बाजी

मुंबईकर संदीप यादवनं 2013 साली जागतिक कुस्तीच्या आखाड्यात आपला ठसा उमटवला. हंगेरीमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत संदीपनं ग्रीको-रोमन कुस्तीच्या 66 किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली. ग्रीको-रोमन कुस्तीत भारताचं हे पहिलंचआंतरराष्ट्रीय पदक ठरलं.

फ्री-स्टाईल गटात ऑलिम्पिकवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त दुखापतींमुळे खेळू शकले नाही. मात्र दोघांच्या गैरहजेरीत भारताच्या युवा पैलवानांनी आपला ठसा उमटवला. अमित कुमारनं 55 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवलं तर बजरंग कुमारनं 60 किलोवजनी गटात कांस्यपदक मिळवलं.

आता 2014 साली कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्सच्या आखाड्यात भारताच्या युवा पैलवानांकडून अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

——–

स्नूकरपटूंची चमकदार कामगिरी

भारताचा आघाडीचा स्नूकरपटू आदित्य मेहतानं 2013 साली वर्ल्ड गेम्समध्ये तिरंगा फडकवला.

वर्ल्ड गेम्स म्हणजे ऑलिम्पिकमध्ये समावेश नसलेल्या खेळांची सर्वात मोठी स्पर्धा. 2013 सालच्या जुलै महिन्यात कोलंबियामध्ये झालेल्या वर्ल्ड गेम्समध्ये आदित्यनं सुवर्णपदक मिळवलं. वर्ल्ड गेम्सच्या तीन दशकांच्या इतिहासात भारताचं हे दुसरंच पदक आहे. 2013 साली पहिल्या इंडियन ओपनमध्ये आदित्यनं रौप्यपदक मिळवलं. तर महिलांमध्ये विद्या पिल्लै आणि अरांता सांचिसच्या जोडीनं आयर्लंडमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवलं.

—-

बॉक्सिंगमध्ये उलथापालथ

भारतीय बॉक्सिंगसाठी मात्र यंदाचं वर्ष निराशाजनक आणि धक्कादायक ठरलं. भारताचा ऑलिम्पिकवीर विजेंदर सिंगवर ड्रग्जच्या तस्करीचे आरोप लागले.

विजेन्दरच्या मित्राला पोलीसांनी ड्रग तस्करीप्रकरणी ताब्यात घेतलं आणि तपासादरम्यान विजेन्दरचं नाव समोर आल्यानं भारतीय क्रीडा विश्वात खळबळ उडाली. मात्र नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं केलेल्या चाचणीत  विजेन्दर निर्दोष असल्याचं समोर आलंपोलीसांनीही त्याला क्लीन चिट दिली. हा सगळा प्रकार मागे टाकत विजेन्दरनं पुन्हा सराव सुरू केला. मात्र त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये यश मिळालं नाही.

भारताच्या युवा बॉक्सर्सनी मात्र चांगली कामगिरी बजावली. शिवा थापानं एशियन युथ चॅम्पियनशिपचं सुवर्णपदकही जिंकलं. मात्र भारतीय बॉक्सिंगमागचं संकट अजूनही संपलेलं नाही. 2012चं वर्ष सरता-सरता भारतीय बॉक्सिंग संघटना म्हणजे आयबीएफवरआंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटना म्हणजे आयबानं बंदी घातली होती. जी अजूनही उठवण्यात आलेली नाही.  नव्या वर्षात बॉक्सिंगला लागलेलं हे ग्रहण सुटेल अशीच आशा.

——–

आयपीएलला स्पॉट फिक्सिंगचा कलंक

इंडियन प्रीमियर लीगसाठी वादविवाद नवे नाहीत. मात्र यंदा आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगच्या खुलाशानं भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप झाला. राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटर्स श्रीशांत अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलीसांनी 16 मे रोजी अटक केली. तीनही खेळाडूंचे फोन रेकॉर्डस आणि सामन्याचं फुटेज यांच्या आधारे तिघांना गजाआड करण्यात आलं. अकरा बुकींनाही पोलीसांनी ताब्यात घेतलं.दरम्यान मुंबई पोलीसांनी चेन्नई सुपर किंग्सचा टीम प्रिन्सिपल आणि बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पनला सट्टेबाजीप्रकरणी अटक केली. श्रीनिवासन यांच्या विरोधात सूर उमटू लागले. मात्र श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी पुन्हा निवडूनयेण्यापासून कोणीही रोखू शकलं नाही.

बीसीसीआयनं तिघा क्रिकेटर्सवर आजीवन बंदी घातली. मात्र आयपीएलची डागाळलेली प्रतिमा कशी सुधारणार हा प्रश्नच आहे.

टीम इंडिया चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स

धोनीच्या टीम इंडियानं 2013 साली वन डेच्या मैदानात एका शानदार विजयाची नोंद केली. भारतानं पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवलं. आयीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे अखेरचं पर्व होतं. जून महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारतानं अंतिम सामन्यात यजमानांवर थरारक विजय मिळवला. शिखर धवन आणि रवीन्द्र जाडेजा भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. धवनला मालिकावीराचा पुरस्कारदेण्यात आला. महिनाभर आधीच भारतीय क्रिकेट आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणानं ढवळून निघालं होतं. पण चॅम्पियन्स ट्रॉफीत धोनी ब्रिगेडच्या विजयानं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या जखमांवर फुंकर घातली.

—-


 

थँक यू, सचिन..

2013 साली भारतीय क्रिकेटमधलं एक युग संपुष्टात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या मैदानातून निवृत्ती जाहीर केली.

तब्बल चोवीस वर्ष क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या सचिननं 2013मध्ये आपली बॅट म्यान करण्याचा निर्णय घेतला.

16 नोव्हेंबर 2013… मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध आपला अखेरचा कसोटी सामना खेळून सचिननं क्रिकेटच्यामैदानातून निरोप घेतला, तेव्हा चाहतेही भावनावश झाले…

अर्थात सचिनला लगेचच ‘भारतरत्न’ जाहीर झाल्यानं चाहत्यांनी आनंदही साजरा केला..

– जान्हवी मुळे

RIN Uprising memorial Colaba, Mumbai

RIN Uprising memorial Colaba, Mumbai

On a busy street in Colaba, Mumbai, just next to the MSLTA courts and opposite to the Taj Wellington Mews, a small garden takes you back in decades. There, in midst of all greenery, stands a staute, Rock Solid frame of a Sailor.

This is the memorial of an inspiring episode in the saga of Indian Freedom struggle- an uprising, that shook the basic foundation of the British Empire and yet, it is relatively unknown to the masses- the Royal Indian Navy Mutiny or Bombay Mutiny, as it is known, or the February 18 revolt, as many would like to call it.

This is the story of the brave young Indians who showed undoubting courage to take on the rulers. Not just common Mumbaikars, students and workers but Naval ratings and servicemen in other cities too stood by their side and their voices stunned the rulers.

The Beginning

It started in the winter of 1945, when the world was just getting to terms with effects of 2nd Great War. Campaign for freedom of India was at its peak and the country was going through turmoil because of widespread movement for Pakistan.

It is in these days, Balai Chandra Dutt along with a small group of naval ratings dreamt of doing something for the country. Dutt was a young Telegraphist aboard the HMIS Talwar- a shore establishment of the British Royal Indian Navy which acted as a Signals School and trained officers and ratings of the RIN in communications and radar. A friend’s journeys through Malay Peninsula and close contact with the Azad Hind Sena Members had inspired the spirit of Nationalism among them. The young boys decided to make their voices heard and on December 1st, when the Navy day celebrations were on, they expressed their emotions through slogans like “Jai Hind” painted on walls of the ship.

It took some time for the British to realise who was behind the graffiti and anti-empire literature distributed across. But finally when they did, Dutt was arrested. The ratings were unhappy about the arrest. over the years, they had suffered ill-treatment and there was simmering discontent over the poor service conditions and humiliation of Indian Leaders by British officers. Dutt’s detention triggered a unanimous call for strike among the Indian ratings on Talwar. several other ships joined in and what started as a non-violent ‘hartal’, turned into a full-fledged revolt.

The Events unfold

On February 18th, the first day of strike, sailors took over Talwar. Since it was like a wireless communication centre, they could spread the word to other ships and establishments. By next day, several other ships in Mumbai, then Bombay, and other ports, notably Karachi joined in the revolt.

In the dusk hours of February 19th, Naval Central Strike Committee (NCSC) was elected. Leading Signalman MS Khan and Petty Officer Telegraphist Madan Singh were unanimously elected as the President and Vice-President. It should be noted that, the choice was made consciously to indicate the religious unity among the rebels.

RIN Revolt

RIN Revolt – March on Mumbai street

The White Ensign was taken down and revolting ships hoisted three flags tied together- those of Congress, Muslim League and CPI. Workers from all ranks, some officers in Castle Barracks and residents of Bombay joined in. on 22nd and 23rd, there were mass agitations on Hornby Road- today’s Dadabhai Novroji Road- near Victoria Terminus (today’s CST station. the demonstrations turned violent and officers opened fire on the ratings.

Indian people, already gripped by the heroics of INA, supported the strike. On 20th February, a general strike was called in Bombay, which later spread to many other cities. The ratings in Calcutta, Madras, Karachi and Vizag also went on strike with the slogans “Strike for Bombay”, “Release 11,000 INA prisoners” and “Jai Hind“.

Many units of the Royal Indian Air Force and Local Police forces went on strike. Naval officers began calling themselves Indian national Navy and offered left-handed salutes. 1000 RIAF men from the Marine Drive and Andheri Camps also joined in sympathy. By the end of the day Baloch and Gurkhas in Karachi had refused to fire on striking sailors.

The Rulers React

Meanwhile, The British government was shell-shocked., Prime Minister Clement Atlee had to order the Royal navy to clench the revolt. British destroyers from Trincomalee in Ceylon (Sri Lank) sailed to Mumbai.

The Flag Officer commanding the RIN, Admiral J.H. Godfrey (yes, the same one on whom Ian Flemming’s “M”- the boss of James Bond is based), gave ultimatum on air “Submit or perish”. A British Bomber planes flew over Bombay Harbour threatening to destroy the mutineers.

Defeat in Karachi 

The clashes between the 2nd British Battalion and ratings holding the Hindustan reached to a tragic conclusion for the mutineers. Sailors decided to hold on and fight back. but by late morning, they had no option but to surrender. Extensive damage had been done to Hindustans superstructure and there were many casualties among the Indian sailors.

Reaction from Political leaders

Both Congress and Muslim League were not prepared for the revolt and got it all wrong. While the movement was appreciated by the masses, no national leader or political party came forward in support. (In fact, Mahatma Gandhi condemned the riots and revolt in his statement on 3rd March 1946)

Only two Leaders –  Aruna Asaf Ali and Achyut Patwardhan assisted the revolutionaries, and Aruna attracted criticism from Gandhi for it. Further, Congress and Muslim league tried to convince the sailors to end their strike

End of Revolt

The leaderless Strikers were disheartened with such political apathy and under the rising pressure, had no option but to give way.  On the evening of February 23rd, after a meeting between Vallab Bhai Patel and MS Khan, President of (NCSC), the revolt was called off. Mohmmed Ali Jinnah supported the action.

Damage to the Empire

The revolt lasted only for 6 days, but was enough to shake the British Empire. It was largest revolt by any of the imperial naval units.  In all, 74 Ships, 20 fleets and 22 units of RIN went on strike.  The Navy was heart of Briton’s success. It was the centre of their pride, the reason for their rise as traders and then rulers around the world.  The same ships and boats had now become a threat.

The World War had hurt the British empire and they were running out of funds. After INA’s heroics and Naval strike, British rulers knew, their armed forces were becoming less and less trustworthy.

Prime Minister Clement Atlee knew the empire would not hold on for long and within two months, on 16th May, Atlee’s Cabinet mission promulgated the plan to decolonize India that paved the way for Independence.

What Happened to the Heroes?

Despite the assurances of the good services, widespread arrests were made. Strikers had to face court martial and most of them were dismissed from service, never to be recalled into either Indian or Pakistani Navies after independence.  The political apathy continued even in the later decades. Till date, History Text books don’t talk much about the revolt.

The recognition finally came in the 1970s when the RIN Revolt was renamed as Naval Uprising and the mutineers were honoured by the government. The Indian Navy named two of its ships after Madan Singh and B.C Dutt. A memorial is built in Mumbai.

Off the main revolutionaries, B C Dutt joined Free Press Journal on S. Sadanand’s offer, but later quit to join an Advertising firm. He spent his years in Mumbai and wrote the book – Mutiny of the Innocents.

Madan Singh, Vice-President of NCSC too joined Free Press Journal as a political correspondent. Within a year, he too quit the job and started business all over the World.  One of his colleagues in the Navy, C.P Ramachandran went on to be an exemplary journalist as the Deputy Editor of the Hindustan Times.

Nothing is known about NCSC president MS Khan- and many others who shed there sweat and blood.

– Janhavee Moole