नाव-गाव-शिक्षण लिहिण्यासाठी हे काही कोणतं प्रोफाईल किंवा डिरेक्टरीतलं पेज नाही.  बाकी ती माहितीही ‘माहिती’ पलिकडे आणखी काही नाही.

माझ्याविषयी मीच काय बोलणार?

तसं माझं आयुष्य चार चौघांपेक्षा काही फार वेगळं नाही.  बस, काही बाबतीत मी स्वतःला लकी समजते, इतकंच..  पण हां, काहीतरी वेगळं करण्याची खुमखुमी अजूनतरी जिवंत आहे. म्हणूनच पत्रकारितेत उतरले आहे.  तेव्हापासून चित्रकला मागे पडली, विज्ञानाचं वेडही उतरतय की काय असं वाटतंय. पण अधूनमधून लिहिण्याचे झटके मात्र येत राहतात.

ब-याचदा एक ना धड भाराभर चिंध्या, असंच वाटतं. पण नंतर कळतं, चिंध्यांचीही गोधडी शिवता येते छान…  तेव्हा ठरवलंच आहे आता. अशाच रंगीबेरंगी चिंध्या शोधायच्या…

Advertisements