माझ्या गावाच्या डोईवर, भीमाशंकराचा हात
नदीमाय देई साथ, आमराईला…

बऱ्याच वर्षांपूर्वी रचलेल्या ओव्यांमधल्या काही ओळी.. बाकीच्या ओव्या आठवत नाहीयेत आता. पण आज या चार ओळींनी आज मात्र सुन्न केलंय.

मालिण गावात घडलेली दुर्घटना मन हेलावून टाकणारी आहे. हे संकट नेमकं कशानं ओढवलं, याचे कयास लावले जातायत. तसं या भागात जोरदार पाऊस नेहमीच होतो. मात्र मोठ्या प्रमाणात दरड कोसळणं क्वचितच घडतं, असं वाटायचं. पण गेल्या काही वर्षांत दरडींचं प्रमाण आणि आकार वाढतो आहे. ज्या डोंगरांकडे पाहून आधार वाटतो, त्याच डोंगरांत काही तरी बदललं आहे, बदलतं आहे.

झाडांची काटछाट, रस्ते-घरं-शेती-फार्महाऊससाठी डोंगर पोखरणं वाढल्यावर दुसरं काय होणार? पूर्वी तरी कुदळ फावडं वापरलं जायचं, आता थेट जेसीबी-पोकलेन मशीन आल्यावर जमिनीला धरून ठेवणाऱ्या झाडांच्या मुळ्याही उखडल्या जातात.  जे मालिणमध्ये घडलं, ते या परिसरातल्या कुठल्याही गावात, कधीही घडू शकतं, ही भीती फक्त भीतीच ठरू दे..

– जान्हवी मुळे

Advertisements