images

सावर…
स्वतःला आवर…
तू म्हणाला होतास,
मनाला जरा थांबव.
आणि खळाळत्या भावनांना
जरा बांध घाल…

मी ऐकलं तुझं.
आणि माझ्या प्रवाहावर
धरण बांधून टाकलं…

आता पाणी वाहात नाही,
म्हणजे वाहताना दिसत नाही.

पण साचून राहिलेलं सारं काही
झिरपत जातं जमिनीत..
खोलवर…
थांबत नाही…
बांध घातला, तरिही

कधी मातीला पोखरत
कधी दगडाला भेदत
वाहात राहतं पाणी…
वाट मोकळी होते, तेव्हा
पाझरतं भेगांमधून
तहान भागवण्यासाठी…
तुझीच.

– जान्हवी मुळे

Advertisements