12 ऑक्टोबर 2011 म्हणजे विजय मर्चंट यांची जन्मशताब्दी.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मर्चंट यांनी आपल्या फलंदाजीनं एक काळ गाजवला..

मर्चंट यांचं नाव पहिल्यांदा प्रकाशात आलं ते मुंबईतील शालेय आणि आंतरकॉलेज क्रिकेटमधील त्यांच्या मोठ्या इनिंग्जमुळे. १९३३मध्ये भारतभूमीवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातूनच विजय मर्चंट यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तब्बल १८ वर्ष मर्चंट खेळत होते. मात्र दुसऱ्या महायुद्धामुळं त्यांना आपल्या कारकीर्दीत केवळ १० कसोटी सामने खेळता आले. त्यातही मर्चंट यांनी ३ शतकं आणि ३ अर्धशतकं ठोकली. मर्चंट यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ८५९ धावा जमायत. तर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मर्चंट यांनी दीडशे सामन्यांमध्ये १३ हजार ४७० धावा केल्यायत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये मर्चंट यांनी ४५ शतकं आणि ५२ अर्धशतकं साजरी केली.

निवृत्तीनंतर मर्चंट यांनी लेखक, प्रशासक, समालोचक म्हणूनही क्रिकेटशी नातं टिकवून ठेवलं. तसंच क्रिकेटपलिकडे अंध आणि अपंग व्यक्तींसाठीही त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. १९८७मध्ये वयाच्या ७७व्या वर्षी मर्चंट यांचं निधन झालं. मात्र आजही भारतीय क्रिकेटमध्ये त्य़ांचं स्थान कायम आहे

Advertisements