विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर रविवारी नोवाक ज्योकोविचचा राज्याभिषेक झाला.. ज्योकोविचनं विम्बल्डन जेतेपदाची राजवस्त्रं आणि अव्वल रँकिंगचा मुकुटही परिधान केला.. 

टेनिसच्या साम्राज्यावर आता त्याची अधिकृत मोहोर उमटलीय. पण आजच नाही तर गेले सहा महिने टेनिस कोर्टवर ज्योकोविचचं वर्चस्व आहे..  

गेल्या वर्षी डेव्हिस कपमध्ये ज्योकोविचनं सर्बियाला जेतेपद मिळवून दिलं आणि तोच त्याच्या कारकीर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर यंदाचं ऑस्ट्रेलियन ओपन, सलग ४३ सामन्यांमध्ये विजय आणि मग विम्बल्डन..  फ्रेन्च ओपनच्या सेमी फायनलमध्ये रॉजर फेडररनं केलेला पराभव वगळता ज्योकोविच यंदाच्या मोसमात ४९ सामन्यांमध्ये तब्बल ४८ वेळा विजयी ठरलाय. 

दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून नोवाकनं टेनिस विश्वातली फेडरर आणि नदालची सद्दी मोडून काढली होती. ज्योकोविचकडे नदालसारखं वलय नाही. आणि फेडररसारखा तो ग्रेसफुलही नाही. पण तो आहे अगदी त्याच्यासारखाच. वन अँड ओन्ली. थोडासा हटके.. म्हणूनच आपल्या पहिल्या विम्बल्डन विजयानंतर नोवाकला सेंटर कोर्टवरच्या गवताची चव घ्यावीशी वाटली...  

एरवीही टेनिस चाहत्यांमध्ये ज्योकोविच लोकप्रिय आहे ज्योकर म्हणून. आणि नोवाकचं हे टोपण नाव अगदी सार्थ आहे.हॅपी गो लकी ज्योकोविच आजच्या जमान्यातला टेनिसचा शो-मॅनच आहे. सर्बियन आणि इंग्लिशबरोबरच तो जर्मन आणि इटालियनही बोलतो. टेनिस कोर्टवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यातही तो पटाईत आहे. नोवाकला आपल्या सहकारी खेळाडूंच्या नकला करताना पाहिलं, की हसू फुटल्याशिवाय रहात नाही.ज्योकोविचच्या बेदरकार वृत्तीमुळं आणि त्याच्या घरच्यांच्या काहीशा उर्मट वागणुकीमुळं त्याच्या बरोबरीचे खेळाडू त्याला फारसा आदर देत नसत. पण आता चित्र बदलतंय. विजयाबरोबरच ज्योकोविचही मॅच्युअर्ड होतोय. आणि त्याचवेळी त्याच्यातला निरागसपणा अजूनही टिकून आहे.   

अंगकाठीनं सडपातळ पण भलताच आक्रमक आणि रांगडा ज्योकोविच सहसा हार न मानणाऱ्यातलाय. ह्या चिवटपणाचं कारण आहे त्याचा सर्बियन वारसा. ज्योकोविच सध्या मोनाकोच्या राजधानीत म्हणजे मॉण्टे कार्लोमध्ये राहतो, पण आपल्या मायदेशाचं, सर्बियाचंच प्रतिनिधित्व करतो. 

युगोस्लाव्हियामध्ये गृहयुद्धाच्या काळात बेलग्रेड शहरात ज्योकोविचचा जन्म झाला. युद्धाच्या धामधुमीतच त्याची टेनिस प्रॅक्टिस चालायची. ज्योकोविच, अॅना इव्हानोविच आणि इतर अनेक खेळाडूंनी प्रसंगी बंद स्विमिंग पूलमध्ये सराव केला. हार न मानण्याची, लढत राहण्याची वृत्ती ज्योकोविचमध्ये तिथूनच आली. 

पुढं युगोस्लाव्हियाचे तुकडे झाले, सर्बियासह नव्या देशांची निर्मिती झाली. पण आणि आता ज्योकोविचच्या रुपानं
Advertisements