कानावर आवाज पडत राहतात, मी बोलत जाते,

उत्तरांमधून पुन्हा नव्याने प्रश्न शोधत राहते…

घड्याळाचे काटे पुढे सरकतात, सेकंदांचा हिशोब लागतो,

ब्रेकमधला बातम्यांचा कोटा पूर्ण होतो.

कधी बाहेर वातावरण तापते, आणि आत विचार साठत राहतात,

एसीमध्ये बसलेल्यांचे शब्द गारठून जातात..

तीच माणसं, तेच बोल, तीच वेळ,

नव्यानं सुरू होणारे जुनेच खेळ.

असेच दिवस सरत जातात, माझे प्रश्न सुरूच राहतात.

जाणिवेच्या पलिकडले काहीतरी जाणवत राहते,

शब्द किंचाळणं सोडून देतात,

आणि स्वप्नांना जाग येते..

-जान्हवी

Advertisements