ग्रँड ओपनिंग आणि ग्रँड क्लोझिंग… याहीपेक्षा कॉमनवेल्थ गेम्स गाजले ते खेळाडूंच्या ग्रेट परफॉर्मन्सनी…

यंदाच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीयांनी शानदार कामगिरी बजावली आहे. अभिनव बिन्द्रा, गगन नारंग, सुशील कुमार, सायना नेहवाल या चॅम्पियन प्लेयर्सनी अपेक्षेप्रमाणेच सोनं लुटलं. पण या स्पर्धेनं देशाला काही नवे हीरोजही दिलेयत..

रायफल शूटर गगन नारंग आणि अभिनव बिन्द्रा या जोडीनं भारताला यंदाचं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. ऑलिम्पिक गोल्डमुळे अभिनव बिन्द्राचं नाव सगळ्या देशभर पोहोचलंय. पण त्याच अभिनवला मागे टाकून गगननं कॉमनवेल्थ गेम्समध्ये एक नाही दोन नाही तर चार गोल्ड मेडल्स मिळवली.

मेडल्स मिळवण्यात भारताच्या महिला खेळाडूही मागं नव्हत्या. पुण्याची अनीसा सय्यद आणि कोल्हापूरची राही सरनोबत.. महाराष्ट्राच्या या कन्यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णवेध केला. पण मेडलपर्यंत दोघींचाही प्रवास सोपा नव्हता. अनीसाला तर बरंच काही सोसावं लागलं. खडतर परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आणि चेहऱ्यावरचं हसू कसं कायम ठेवायचं हे अनीसा आणि राहीला पाहून लक्षात येतं. बाईट – अनीसा राही

काहीसा असाच संघर्ष करावा लागला गीता, बबिता, अनीता या भारताच्या कुस्तीकन्यांना.. आणि कविता राऊतसारख्या अनेक अथलीट्सना.. पण त्यांच्या जिद्दीची कहाणी आज करोडो भारतीयांसाठी प्रेरणा देणारी ठरलीय. कविताला तर एकेकाळी पाण्यासाठी वणवण करावी लागायची. रानातल्या त्या कष्टांनीच तिला बळ दिलं ट्रॅकवर धावण्याचं..

अशीच मेहनत कुस्तीच्या आखाड्यात घेतली ती सुशील कुमारनं. सुशीलनं कुस्तीतलो सगळे आंतरराष्ट्रीय आखाडे मारलेयत. बापरौलाच्या या सिध्यासाध्या पैलवानानं कुस्तीला एक नवं ग्लॅमर मिळवून दिलंय.

वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या खेळाडूंमध्ये दीपिका कुमारीचंही नाव घ्यावं लागेल. आर्चरीत दीपिकानं सोनेरी लक्ष्यवेध केला, तोही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी.

लहान वयतच असे मोठं शिखर गाठलंय ते बॅडमिन्टन क्वीन सायना नेहवालनं. सायनाची लोकप्रियता कीती वाढलीय याचा अनुभव गेम्सच्या शेवटच्या दिवशी आला. सिरी फोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हजारो फॅन्सनी सायनाच्या मॅचसाठी गर्दी केली होती. सायननानं त्या मॅचमध्ये पराभवाच्या तोंडातून विजय खेचून आणला. नव्या पिढीच्या खेळाडूंचीच नाही तर तमाम भारतीयांची सायना प्रतिनिधी आहे. आक्रमक, लढाऊ बाण्याची, तरिही शांत आणि संयमी..

Advertisements